सुरगावात रंगाविना धुळवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 11:29 PM2018-03-03T23:29:29+5:302018-03-03T23:29:29+5:30
सूरगाव येथे रंगाविना धुळवड साजरी केली जाते. मागील २१ वर्षांची परंपरा कायम ठेवत यानिमित्त आयोजित तीन दिवसीय प्रबोधनपर कार्यक्रमाचा समारोप धुळवडीला करण्यात आला.
ऑनलाईन लोकमत
सेलू : सूरगाव येथे रंगाविना धुळवड साजरी केली जाते. मागील २१ वर्षांची परंपरा कायम ठेवत यानिमित्त आयोजित तीन दिवसीय प्रबोधनपर कार्यक्रमाचा समारोप धुळवडीला करण्यात आला. तुकडोजी महाराज लिखीत ग्रामगीतेतील ओळीला कृतीत उतरविणाऱ्या सूरगाववासीयांचा हा अभिनव धुलीवंदन सोहळा महाराष्ट्रातून आलेल्या पाहुण्यांनी डोळ्यात साठविला.
गावात धुळवडीला दिवाळीपेक्षाही मोठा आनंदोत्सव साजरा होतो. सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांची रेलेचेल असते. एक नवी उर्जा घेवून येथील निरोप घेणारा प्रत्येकजण धन्यधन्य झाला. धुलीवंदनानिमित्त आयोजित तीन दिवसीय संतविचार ज्ञानयज्ञाचे उद्घाटन प्रफुल्ल लुंगे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रामुख्याने सामाजिक कार्यकर्ते एम.बी. महाकाळकर उपस्थित होते.
समारोपीय कार्यक्रमात सकाळी रामधून काढण्यात आली. ग्रामस्थ, पाहुणे, पंचक्रोशीतील नागरिक सहभागी झाले होते. यात सहभागी प्रत्येकाने शुभ्रवस्त्र परिधान केले होते. पुरुषांनी भगवी टोपी घातली होती. राष्ट्रसंत नामाचा गजर करीत निघालेल्या प्रभात फेरीची लांबी गावाच्या एक टोकापर्यंत होते. स्वागत कमानी, फाटक, तोरण, पताका, रांगोळी, विविध संताचे सजविलेल्या आसनावर ठेवलेल्या प्रतिमा सर्वधर्म समभावाची साक्ष देत होत्या. समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष सप्तखंजेरीवादक इंजि. भाऊसाहेब थुटे होते. मंचावर कॅप्टन मोहन गुजरकर, निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे, मोहन अग्रवाल, प्रफुल्ल लुंगे, एम.बी. महाकाळकर, उमेश चंदनखेडे, अनिल नरेडी, सुनील बुरांडे, भाष्कर वाळके, शंकर मोहोड (वर्धा), किशोर करंदे, प्रकाश कदम, सुरेशदादा मांडळे, बा.या. वागदरकर, बा.दे. हांडे, निर्मला खडतकर, डॉ. शोभा बेलखोडे, सुरेखा थुटे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे मुख्य आयोजक व सप्तखंजेरीवादक प्रवीण महाराज देशमुख यांनी प्रास्ताविक केले. मातोश्रीच्या मृत्यूनंतर तेरवी न करता ती रक्कम राष्ट्रसंताच्या कार्यालयाला दान दिल्याबद्द्ल प्रवीण महाराज देशमुख यांचा नरेडी यांनी शाल, श्रीफळ, भेटवस्तू देवून सत्कार केला.
या उपक्रमात आजचा युवक विषयावर अक्षयप्रकाश कदम, दिगांबर गाडगे यांच्या नकला, सामान्य ज्ञान परीक्षा, बाल मेळावा, सर्वधर्म समन्वय संमेलन, चंद्रपूरचे मारूती साव यांचे मार्गदर्शन, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, शेतकरी मेळावा आदी कार्यक्रम पार पडले. कार्यक्रमाचे संचालन शुभम मेहता यांनी तर आभार किशोर दखळकर यांनी मानले. प्रवीण महाराज देशमुख यांचा प्रबोधनपर कार्यक्रम झाला. गावकºयांनी सहकार्य केले.
तुकडोजी वॉर्ड येथे पर्यावरणपूरक होळी
हिंगणघाट - संत तुकडोजी वॉर्ड, तांबूलकर ले-आऊट येथील नागरिकांनी एकमताने निर्णय घेऊन लाकूड न जाळता कचरा जाळून होळी केली. पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवे. हाच उद्देश डोळ्यापुढे ठेवून येथील नागरिकांनी पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचा निर्णय घेतला. परिसरातील कचरा गोळा करून होळी पेटवली. यापुढे ही परंपरा कायम ठेवण्याचा संकल्प केला. या उपक्रमातून स्वच्छ शहर मोहिमेला हातभार लावला. देविदास कडू, ठेमसे, संजय चौधरी, शेषराव भोयर, शंकर धोटे, सुरेश घोडे, रामानंद चौधरी, संजय धोटे, राजाभाऊ ढाले, अंबादास बाराहाते, कांबळे आदींनी उपक्रमाला सहकार्य केले.
अल्लीपूर येथे अभिनव धुलीवंदन
अल्लीपूर - श्री गुरुदेव सेवा मंडळ अल्लीपुरच्यावतीने रंगाविना होळी हा अभिनव धूलिवंदन कार्यक्रम घेण्यात आला. यानिमित्त सकाळीच गावातून रामधुन काढण्यात आली. याला ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद देत कार्यक्रमात सहभाग घेतला.
पर्यावरण बचाव समितीकडून नैसर्गिक रंगाचे वाटप
आर्वी - जखमी वन्यजीवांना जीवदान देण्याºया व निसर्गरक्षणाची कास धरलेल्या पर्यावरण बचाव समिती व प्राणीमित्र संघटनेने यंदा पर्यावरणपूरक होळीसाठी पुढाकार घेतला. या अनुषंगाने आर्वी नगरवासीयांना फळाफुलांपासून तयार केलेले नैसर्गिक रंग देण्यात आले. बाजारपेठेमध्ये मिळणारे कृत्रिम रंग मानवी शरीर तसेच पर्यावरणातील सजीव घटकावर विपरीत परिणाम करतात. या रंगापासून निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन पर्यावरण बचाव समितीने पुढाकार घेत नैसर्गिक साधनांपासून पर्यावरणपूरक रंग तयार केले. या उपक्रमाला प्रशासकीय योजनेत सहभागी करून घेण्यासाठी पर्यावरण बचाव समितीने उपविभागीय दंडाधिकारी, पोलीस निरीक्षक यांना नैसर्गिक रंगाची भेट दिली. निवेदन देताना आकाश ठाकरे, रितेश कटेल, मोनू मुल्ला, ऋषिकेश शिधाम, संकेत विरपाचे, ऋत्विक ईखार, नितेश भेलेकर, संकेत विरपाचे, विशाल आत्राम, अंकुश कुशराम, मोंटू जाऊरकार, अनिकेत दरोकर, तन्मय थेरे, अथर्व मोहदेकर, शुभम जगताप उपस्थित होते.