३० ठिकाणी रांगोळीची आरास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:42 AM2018-02-27T00:42:30+5:302018-02-27T00:42:30+5:30
शहरातील काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला कचरा टाकल्या जात होता. सदर कचऱ्यांचा व त्याच्या दुर्गंधीचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत. स्वच्छ वर्धा या उद्देशाने स्थानिक न.प.तर्फे विशेष उपक्रम हाती घेऊन घाणीच्या विळख्यात अडकलेल्या...
आॅनलाईन लोकमत
वर्धा : शहरातील काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला कचरा टाकल्या जात होता. सदर कचऱ्यांचा व त्याच्या दुर्गंधीचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत. स्वच्छ वर्धा या उद्देशाने स्थानिक न.प.तर्फे विशेष उपक्रम हाती घेऊन घाणीच्या विळख्यात अडकलेल्या सुमारे ३० जागांची निवड करीत परिसर स्वच्छ करून तेथे जनजागृतीपर रांगोळीची आरास काढण्यात आली आहे. शिवाय या परिसरात कचरा टाकताना कुणी आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असा सूचना फलकही लावण्यात आला आहे.
स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्यानिमित्ताने वर्धा न.प.च्यावतीने शहरात स्वच्छतेबाबत मोठी लोकचळवळ उभी केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून सदर उपक्रम राबविण्यात आला आहे. सदर उपक्रम राबविण्या पूर्वी पालिकेच्या स्वच्छता विभागाच्या अधिकाºयांनी शहराचा फेरफटका मारून नेहमी घाणीच्या विळखा राहणाºया जागांची निवड केली. तेथे टाकल्या जाणाºया कचºयावर कायमस्वरूपी अंकुश कसा लावता येईल या हेतूने सर्वप्रथम पालिका कर्मचाºयांनी तो परिसर स्वच्छ केला. त्यानंतर तेथे स्वच्छतेबाबत जनजागृती होईल या आशयाची रांगोळी रेखाटण्यात आली आहे. इतक्यावरच पालिका अधिकारी व कर्मचारी थांबले नाहीत तर त्यांनी शहरातील सदर तीसही ठिकाणी कायमस्वरूपी ते परिसर स्वच्छ रहावे या उद्देशाने न.प.द्वारे केल्या जाणाºया दंडात्मक कारवाईचे सूचना फलक लावले. त्यामुळे आता या जागांवर जो कचरा टाकेल त्यास दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागणार आहे.
कचरा जाळणाºयांना दंड ठोठावून होणार त्याची वसूली
नगर परिषदेने उपलब्ध करून दिलेल्या घंटागाडीत किंवा ठिकठिकाणी ठेवलेल्या मोठ्या कचरापेटीत ओला व सुका कचरा न टाकता रस्त्याच्या कडेला कचरा टाकणाºयांवर पालिकेच्यावतीने दंडात्मक कारवाई केली जात आहे. तर आता कचरा जाळणाºयांवरही वर्धा न.प. दंडात्मक कारवाई करणार आहे. कचरापेटी वगळता इतर कुठेही कचरा टाकणाºयांना धडा शिकविण्यासाठी दररोज न.प.ची चमु सायंकाळी शहरात फेरफटका मारणार आहे.