रापमच्या कर्मचाऱ्यांनी वाजविला ढोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 10:22 PM2018-02-16T22:22:41+5:302018-02-16T22:23:27+5:30

एस.टी. कर्मचारी यांचा कामगार करार तात्काळ करण्यात यावा, या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी सेवाग्राम भागातील रापमच्या विभागीय कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी ‘ढोल बजाओ शासन जगाओ’ आंदोलन केले.

Rapapani staff played the drum | रापमच्या कर्मचाऱ्यांनी वाजविला ढोल

रापमच्या कर्मचाऱ्यांनी वाजविला ढोल

Next
ठळक मुद्देआंदोलन : शासनाच्या नव्या धोरणांचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : एस.टी. कर्मचारी यांचा कामगार करार तात्काळ करण्यात यावा, या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी सेवाग्राम भागातील रापमच्या विभागीय कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी ‘ढोल बजाओ शासन जगाओ’ आंदोलन केले. याप्रसंगी विविध मागण्यांचे निवेदन आंदोलनकर्त्यांनी विभाग नियंत्रक राजेश अडोकार यांना सादर केले.
आंदोलनादरम्यान रापमच्या विभागीय कार्यालयासमोर ढोल वाजवून सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला. या आंदोलनादरम्यान एस.टी. कर्मचाऱ्यांनी राज्य परिवहन कर्मचारी यांचा प्रलंबित कामगार वेतन करार त्वरीत करण्यात यावा, राज्य परिवहन कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, राज्य परिवहन कर्मचारी यांना राज्य शासनाचा दर्जा देण्यात यावा, मागासवर्गीय कर्मचाºयांवर होणारा अन्याय दूर करावा, आरक्षण संपविण्याचे षडयंत्र बंद करावे, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवरील खोटे आरोपपत्र रद्द करावे, ग्रामीण जनतेला योग्य सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावे, शासनाने महामंडळात सुधारणा करण्याच्या दृष्टीने बजेटची तरतूद करून राज्य परिवहन महामंडळात सुधारणा करावी आदी मागण्या यावेळी लावून धरण्यात आल्या.
आंदोलनात धर्मपाल ताकसांडे, रवींद्र मांडवे, एम.एस.ओरके, राजू पाटील, रमेश कांबळे, श्रीकांत ढेपे, नंदकुमार कांबळे, विजय खोब्रागडे, पृथ्वीराज वाघमारे, अनिल थुल, पंकज नगरकर, शेख रज्जाक आदी सहभागी झाले होते.

Web Title: Rapapani staff played the drum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.