युवतीवर बलात्कार; तक्रार न करण्यास खंडणीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 05:23 AM2017-11-23T05:23:18+5:302017-11-23T05:23:32+5:30

हिंगणघाट (वर्धा) : चंद्रपूर येथील एका अल्पवयीन युवतीला गेस्ट हाऊसमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.

Rape of a young woman; The demand for ransom is not to complain | युवतीवर बलात्कार; तक्रार न करण्यास खंडणीची मागणी

युवतीवर बलात्कार; तक्रार न करण्यास खंडणीची मागणी

Next

हिंगणघाट (वर्धा) : चंद्रपूर येथील एका अल्पवयीन युवतीला गेस्ट हाऊसमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. तसेच पीडितेने पोलिसांत तक्रार करू नये यासाठी तिच्यासोबतच्या महिलेसह चौघांनी आरोपीकडे पाच लाखांच्या खंडणीची मागणी केल्याचेही बुधवारी उघडकीस आले. याप्रकरणी पोलिसांनी एकावर बलात्कार व पास्को, तर चौघांवर खंडणी वसुलीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मंगळवारी पंजाब तानबा येरेकर (रा. जेटपुरा, चंद्रपूर) व गायत्री गजानन तांबोळी (रा. म्हाडा कॉलनी, चंद्रपूर) या दोघांनी येथील एका अल्पवयीन युवतीला नागपूरला जाण्यासाठी सोबत घेतले. त्यांनी रात्री तिला हिंगणघाट येथील एल. एल. गेस्टहाऊस येथे आणले. या ठिकाणी आरोपींनी दोन खोल्या घेतल्या. एका खोलीत आरोपी गायत्री तांबोळी व पीडित तरुणी, तर दुसºया खोलीत आरोपी पंजाब येरेकर होता.
रात्री १०.३०च्या सुमारास औषध आणण्यासाठी गायत्री खोलीतून निघून गेली. यानंतर पंजाबने खोलीत शिरून बलात्कार केला. मध्यरात्री गायत्री खोलीवर आली. हा प्रकार कळताच तिने प्रशांत राजमवार, रामकली रामटेके व प्रवीण बत्रा या साथीदारांना बोलवून घेतले.

Web Title: Rape of a young woman; The demand for ransom is not to complain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.