वर्धा जिल्ह्यातील वायगाव येथे रास्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 01:28 PM2021-02-06T13:28:52+5:302021-02-06T13:29:12+5:30
Wardha News अखिल भारतीय किसान सभा शाखा वायगाव(नि) मार्फत वायगाव(नि) चौ-रस्ता येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा - अखिल भारतीय किसान सभा शाखा वायगाव(नि) मार्फत वायगाव(नि) चौ-रस्ता येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यात केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, शेतातील सर्व पिकांवर खर्चाच्या दीडपट हमीभाव जाहिर करा, ख़तावर अनुदान वाढवावे अश्या वेगवेगळ्या मागण्या करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यात केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनात अनिल निमजे, आशा इखार, कांचन हिंगे, नीता वटे, संदीप मोरे, शंकर इखार, राहुल झामरे, राजू टोनपे, अतुल ठाकरे, ज्ञानेश्वर नरड़, प्रमोद झामरे, मारोती भूरे, प्रमोद ढगे, मंगेश घोड़े, मंगेश मंगरुळकर, राजू निमजे, संदीप पांडे आदि उपस्थित होते.