रामनगरात पोलीस बंदोबस्तात रावणदहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 06:00 AM2019-10-10T06:00:00+5:302019-10-10T06:00:11+5:30

रामनगर भागातील चौपाटी मैदानावर रावणदहनाचा कार्यक्रम आयोजित असल्याचे लक्षात येताच आदिवासी बांधवांनी एकत्र येत रामनगर भागातील चौपाटी मैदान गाठले. रावणदहनाचा विरोध करण्यासाठी आदिवासी बांधव येत असल्याची माहिती मिळताच सदर कार्यक्रमादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनीही बंदोबस्तात वाढ केली. शिवाय विरोध दर्शविण्यासाठी आलेल्या आदिवासी बांधवांना रामनगर भागातील गर्जना चौकामध्ये अडविले.

Ravandhan in police settlement at Ramnagar | रामनगरात पोलीस बंदोबस्तात रावणदहन

रामनगरात पोलीस बंदोबस्तात रावणदहन

Next
ठळक मुद्देआदिवासी बांधवांनी केला विरोध : परवानगी देणाऱ्यांच्या विरोधात रोष

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आदिवासी बांधवाचे श्रद्धास्थान राजा रावण असून त्यांचे आम्ही पूजन करतो. रुढी व परंपरेनुसार रावणदहन करणे हे चुकीचे असून होणारे रावणदहन थांबविण्यात यावे, अशी मागणी करीत मंगळवारी आदिवासी बांधवांनी रामनगर येथील चौपाटी मैदानावर धडक देत आपला रोष व्यक्त केला. आदिवासी बांधवांच्या या पवित्र्यामुळे परिसरात काही काळाकरिता तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांच्या मध्यस्तीअंती रावणदहनाचा कार्यक्रम पार पडला.
रामनगर भागातील चौपाटी मैदानावर गर्जना सामाजिक संघटनेच्यावतीने मागील अनेक वर्षांपासून रावणदहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यंदाही आयोजकांनी रितसर परवानगी घेत सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दसऱ्याच्या पूर्वी आदिवासी बांधवांनी राजा रावण हे आमचे दैवत असून त्याची आम्ही पूजा करीत असल्याने समाजबांधवांच्या भावना लक्षात घेऊन कुठल्याही अधिकाऱ्याने रावणदहनाच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये, अशी मागणी केली होती. तसे निवेदनही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. इतकेच नव्हे तर ज्या ठिकाणी रावणदहनाचा कार्यक्रम होईल येथे आम्ही त्या कार्यक्रमाला विरोध करू असेही निवेदनातून स्पष्ट केले होते.
रामनगर भागातील चौपाटी मैदानावर रावणदहनाचा कार्यक्रम आयोजित असल्याचे लक्षात येताच आदिवासी बांधवांनी एकत्र येत रामनगर भागातील चौपाटी मैदान गाठले. रावणदहनाचा विरोध करण्यासाठी आदिवासी बांधव येत असल्याची माहिती मिळताच सदर कार्यक्रमादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनीही बंदोबस्तात वाढ केली. शिवाय विरोध दर्शविण्यासाठी आलेल्या आदिवासी बांधवांना रामनगर भागातील गर्जना चौकामध्ये अडविले. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करीत रावणदहनाचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांकडून रितसर परवानगी असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांना दिली. सदर घटनेमुळे परिसरात काही काळाकरिता तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलीस बंदोबस्तात रामनगर येथे रावणदहनाचा कार्यक्रम पार पडला.

चौपाटी मैदानाला आले होते पोलीस छावणीचे स्वरूप
रावणदहन कार्यक्रमादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रामनगर भागातील चौपाटी मैदान परिसरात पोलिसांच्या तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. रावणदहन कार्यक्रमाला विरोध दर्शविण्यासाठी आदिवासी बांधव येत असल्याची माहिती मिळताच रामनगरचे ठाणेदार धनाजी जळत हे त्यांच्या सहकार्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर घटनास्थळी दंगल नियंत्रण पथक, सीआरपीएफच्या जवानांना पाचारण करण्यात आले होते. मंगळवारी सायंकाळी पोलिसांच्या बंदोबस्तामुळे रामनगर भागातील चौपाटी मैदानाला पोलीस छावणीचेच स्वरूप आले होते.

रामनगर भागातील चौपाटी मैदानावर आयोजित रावणदहन कार्यक्रमाला रितसर परवानगी देण्यात आली. रावणदहन कार्यक्रमादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सदर परवानगी देताना उपविभागीय पोलीस अधिकाºयांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमस्थळी बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना पोलीस विभागाला देण्यात आल्या होत्या.
- सुरेश बगळे, उपविभागीय महसूल अधिकारी, वर्धा.

Web Title: Ravandhan in police settlement at Ramnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dasaraदसरा