कोटंबा बंधाऱ्यावर पुलाची निर्र्मिती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 05:00 AM2020-03-22T05:00:00+5:302020-03-22T05:00:16+5:30

कोटंबा गावाला लागून तत्कालीन लघुसिंचन विभागाच्या वतीने बंधारा बांधण्यात आला होता. बंधारा गावालगतच असल्याने गावात पाणी शिरण्याच्या भितीने बंधाऱ्यांची उंची वाढविता आली नाही. ज्या उद्दीष्टासाठी बंधारा बांधण्यात आला त्याची उद्दीष्टपूर्तीच झाली नाही. बंधाऱ्यातून नहरावाटे शेतीला पाणी देण्याची योजना होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमीनिचे भूसंपादन करून नाममात्र मोबदला देत जमिनी ताब्यात घेत लघुसिंचन विभागाने नहर खोदले.

Rebuild the bridge over the Kotamba Dam | कोटंबा बंधाऱ्यावर पुलाची निर्र्मिती करा

कोटंबा बंधाऱ्यावर पुलाची निर्र्मिती करा

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी । सिंचनासाठी सोय पण, वहिवाट थांबली

लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : तालुक्यातील कोटंबा येथील बोरनदीपात्रावर सुमारे ३५ वर्षांपूर्वी बंधारा बांधण्यात आला होता. नहरावाटे शेती सिंचनाखाली आणण्याची योजना होती. पण, योजना फसली. बंधाºयातील संग्रहीत पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरींना बारामाही पाणी राहते. शेतकऱ्यांना सिंचनासाठी चांगली सोय झाली पण, वहिवाट मात्र, थांबली असल्याने कोटंबा येथील बंधाऱ्यावर पुलाची निर्मिती करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
कोटंबा गावाला लागून तत्कालीन लघुसिंचन विभागाच्या वतीने बंधारा बांधण्यात आला होता. बंधारा गावालगतच असल्याने गावात पाणी शिरण्याच्या भितीने बंधाऱ्यांची उंची वाढविता आली नाही. ज्या उद्दीष्टासाठी बंधारा बांधण्यात आला त्याची उद्दीष्टपूर्तीच झाली नाही. बंधाऱ्यातून नहरावाटे शेतीला पाणी देण्याची योजना होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमीनिचे भूसंपादन करून नाममात्र मोबदला देत जमिनी ताब्यात घेत लघुसिंचन विभागाने नहर खोदले. कोरडवाहू शेती ओलीताखाली येणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद होता. तुडुंब भरलेल्या बंधाऱ्यातून नहरात पाणी सोडण्याचा प्रयोग झाला पण, पाण्याला प्रेशर नसल्याने हा प्रयोग फोल ठरला. बंधाºयाची उंची कमी पडली, जर उंची वाढविली तर गावात पाणी शिरण्याचा धोका, अशा विवंचनेत अधिकारी व अभियंते होते. तेव्हापासून हा बंधारा पाणी संचय करण्याच्या कामाचाच ठरला आहे. शेतकºयांच्या शेतातून खोदलेले नहर १० ते २० वर्षे तसेच होते. मात्र, पाणीच येणार नाही याची खात्री झाल्यावर शेतकºयांनी ते बुजवून टाकले. काही वर्षांपूर्वी बंधाºयाला मोठाले छिद्र पडले होते. त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत होता. हळूहळू मोठा भाग खचला, पण, कुणीही त्याकडे लक्ष दिले नाही.
लोकमतने याबाबत वारंवार पाठपुरावा केला. कोटंबा येथील गावकºयांनीही बंधाºयावरील पुलाची मागणी रेटून धरली. तत्कालीन आमदार प्रा. सुरेश देशमुख हे सिंचन मंडळाचे उपाध्यक्ष असतांना त्यांनी बंधाºयाच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करून दुरूस्ती केली. आज या बंधाºयात पाण्याचा मोठा संचय असतो. शेतकऱ्यांनी ओलीतासाठी मोटरपंप लावली आहे. पाणीसाठ्यामुळे परिसरातील पाण्याच्या स्त्रोतांनाही फायदा झाला आहे. मार्च महिन्यात बंधारा ओसंडून वाहत आहे. बंधाऱ्यावर बांधण्यात आलेल्या रपट्यावरून पाणी वाहत असल्याने शेतकऱ्यांची वहिवाट रखडली आहे. त्यामुळे बंधाºयावरील पुलाची निर्मिती करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

रहदारीला निर्माण होतोय अडथळा
बोर नदीपात्रावरील बंधाऱ्यासमोरून सेलू, धानोली (मेघे) मार्गे कोटंबा, धपकी, चारमंडळ असा रस्ता आहे. बंधाऱ्या समोर सिमेंट पाईप टाकून बुडीत रपटा तयार करण्यात आला आहे. त्यावरून रहदारी असते. मात्र, पाणी वाढले की रहदारी रखडत असल्याने मोठ्या पुलाच्या निर्मितीची गरज आहे.

कोटंबा बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील व परिसरातील गावातील पाण्याचे स्त्रोत वाढले याचा फायदाच आहे. बंधाऱ्या समोर असलेला रपटा पावसाळ्यात धोक्याचा व रहदारीत अडचण आणणारा ठरतो. त्यामुळे पुलाची निर्मीती केल्याच कायमची चिंता मिटेल.
- पंढरी खापरे, शेतकरी चारमंडळ, सेलू.

Web Title: Rebuild the bridge over the Kotamba Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.