कोविशील्ड लसीचे 10 हजार डोस प्राप्त, 41 केंद्रावर लसीकरणास प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 12:56 PM2021-07-08T12:56:20+5:302021-07-08T12:57:07+5:30
आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या केंद्रावर नागरिकांची लसीकरणासाठी प्रचंड गर्दी झाल्याने तेथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पाऊस असूनही नागरिक लस घेण्यासाठी केंद्रांवर रांगा लावून आहेत
वर्धा : जिल्ह्यात आतापर्यंत 3 लक्ष 88 हजार 567 नागरिकांना कोविड लसीकरणाचा पहिला व दुसरा डोज देण्यात आला आहे. शासनाकडून प्राप्त लसीचे डोजच्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. कोविशील्ड लसीचे 10 हजार डोज जिल्ह्याला प्राप्त झाले असून गुरुवारी 41 केंद्रावर 18 वर्षापुढील सर्व वयोगटासाठी लसीकरण सुरू झाले.
आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या केंद्रावर नागरिकांची लसीकरणासाठी प्रचंड गर्दी झाल्याने तेथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पाऊस असूनही नागरिक लस घेण्यासाठी केंद्रांवर रांगा लावून आहेत. 18 वर्ष वयापुढील नागरिकांसाठी पहिला डोस तसेच 45 वयापेक्षा जास्त नागरिकांसाठी पहिला आणि दुसरा डोस सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत खालील लसीकरण केंद्रावर उपलब्ध राहील.