२,९५५ ग्राहकांकडून १.७८ लाखांची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:44 AM2018-02-27T00:44:48+5:302018-02-27T00:44:48+5:30
महावितरणची वीज वापरून वीज देयकाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या वर्धेतील २ हजार ९५५ ग्राहकांची वीज कापली होती. खंडित केलेला वीज पुरवठा सुरळीत करताना या ग्राहकांकडून वीत जोडणी शुल्क आकारणीच्या नावावर महावितरणने चांगलीच कमाई केली आहे.
आॅनलाईन लोकमत
वर्धा : महावितरणची वीज वापरून वीज देयकाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या वर्धेतील २ हजार ९५५ ग्राहकांची वीज कापली होती. खंडित केलेला वीज पुरवठा सुरळीत करताना या ग्राहकांकडून वीत जोडणी शुल्क आकारणीच्या नावावर महावितरणने चांगलीच कमाई केली आहे. जिल्ह्यातील तीन विभागात कंपनीकडून तब्बल १ लाख ७८ हजार ५९५ रुपये महावितरणच्या तिजोरीत जमा झाल्याची माहिती माहिती महावितरणने दिली आहे.
थकीत देयकापोटी महावितरणकडून घरगुती, वाणिज्य आणि सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेतील थकबाकीदार वीज कापली होती. यात वर्धेतील २५ पाणी पुरवठा योजकांकडून पुरवठा ठप्प करण्यात झाला होता. यात अनेक ग्रामपंचायतींनी वीज कापताच थकीत देयकाचा भरणा केल्याचे सांगण्यात आले आहे.
नागपूर परिमंडल कार्यालयाच्या अखत्यारीत येणाºया वर्धा जिल्ह्यात वीज वापरून देयकाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाºया वीज ग्राहकांच्या विरोधात महावितरणने धडक कारवाई सुरु केली आहे. थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा तोडून थकबाकीची रक्कम पूर्णपणे भरणे आणि पुनर्रजोडणी शुल्क भरून पुन्हा वीज पुरवठा सुरु करणे असे मोहिमेचे स्वरुप आखण्यात आले आहे. वीज देयकाचा नियमितपणे भरणा करणाºया वीज ग्राहकांनी वापरलेल्या वीज बिलापोटी ५१ कोटी २२ लाख १९ हजार रुपयांचा भरणा केला आहे.
५.४२ लाख ग्राहक नियमित
जिल्ह्यात एकूण ९ लाख ३३ हजार ३६१ वीज ग्राहक आहेत. यातील ५ लाख ४२ हजार ३५० वीज ग्राहक नियमितपणे वीज देयकाचे पैसे भरत असल्याचे निदर्शनास आले आहे. तर उर्वरीत देयकाचा भरणा करण्याकडे दुर्लक्ष करणारे असल्याचे या मोहिमेत दिसून आले.