प्रवाशांची वाट पाहतेय लालपरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 05:00 AM2020-05-28T05:00:00+5:302020-05-28T05:00:11+5:30
आर्वी आगाराच्या बसेस २२ मे पासून सुरू झाल्या आहेत. आर्वी ते वर्धा आणि आर्वी ते आष्टी या पूर्व-उत्तर दोनच मार्गावर सात बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. आर्वी पुलगाव आणि आर्वी- अमरावती या पश्चिम दक्षिण मार्गावरचे बसेस बंद आहे सकाळी ७ वाजता वर्धा आणि ७.३० वाजता आष्टी साठी बस सोडली जाते. त्यानंतर दर एक तासाने बसचे शेड्युल असून सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत बसगाडी नाही.
राजेश सोळंकी।
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी/देऊरवाडा : कोरोणा विषाणूचा प्रादुभार्वावर रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असल्यातरी लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात लालपरीला जिल्ह्यांतर्गत फिरण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र लालपरीची प्रवाशांनी धास्ती घेतल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. अत्यल्प प्रमाणात प्रवाशांची ये-जा सुरू आहे ५५ प्रवाशाची क्षमता असलेल्या बसमध्ये केवळ ५ ते ७ प्रवासी असल्याने बसमधील सोशल डिस्टन्सिंग मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आर्वी आगाराच्या बसेस २२ मे पासून सुरू झाल्या आहेत. आर्वी ते वर्धा आणि आर्वी ते आष्टी या पूर्व-उत्तर दोनच मार्गावर सात बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. आर्वी पुलगाव आणि आर्वी- अमरावती या पश्चिम दक्षिण मार्गावरचे बसेस बंद आहे सकाळी ७ वाजता वर्धा आणि ७.३० वाजता आष्टी साठी बस सोडली जाते. त्यानंतर दर एक तासाने बसचे शेड्युल असून सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत बसगाडी नाही. ७ शेड्युलमध्ये १४ चालक वाहक आहे दररोज सात ते आठ हजार किलोमीटरचा प्रवास सध्या या बसेस करतात या सात बसेसचे उत्पन्न किमान तीस हजार दररोज अपेक्षित आहे. मात्र दररोज सात ते आठ हजार रुपयाची आवक असल्याने उपस्थित कर्मचाऱ्यांचा पगार ही यात निघत नाही. सध्या २० ते ३० च्या दरम्यान लोड फॅक्टर आहे. हा ५० ते ६० च्या दरम्यान असावयास पाहिजे होता. मंगळवारी २०० प्रवासी तर बुधवारी १९२ प्रवाशांनी या मार्गावर जाणे-येणे केल्याची नोंद आहे
आर्वी आगारात ९६ चालक ९६ वाहक आहे तर २३ चालक-वाहक (टू-इन-वन) आहे २३ मेकॅनिकल आणि १२ कार्यालयीन स्टॉप तर आठ वाहतूक नियंत्रक आहेत. आगार व्यवस्थापक व वाहतूक निरीक्षक आणि इतर असे एकूण २६१ कार्यरत कर्मचारी आर्वी आगारात कार्यरत आहेत. या आगारात ४४ बसेस असून दररोज १९ हजार ५०० किलोमीटरचा प्रवास या बसेस करीत होत्या. साधारणत दररोज साडेपाच ते सहा लाख रुपये उत्पन्न होते. उन्हाळ्याच्या दिवसात विवाह सोहळ्याचे ९ ते १० लाखाचे उत्पन्न दरवर्षी होते आणि इतर उत्पन्न स्त्रोत वेगळेच होते मात्र आता कोरोणाच्या प्रादुभार्वाने विवाह सोहळे लॉकडाऊन झाले आहे तेरावी चौदावी , बारसे मुंज, साक्षगंध आदी विविध कार्यक्रम समारंभ, पाहूनपण ,सर्वच लॉकडाऊन झाल्याने प्रवाशांची ये-जा थांबली आहे. त्यामुळे फार मोठा फटका लाल परीच्या आर्थिक व्यवहारावर पडल्याने लाखो रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.
सध्या आर्वी वर्धा, आणि आर्वी आष्टी या मार्गावर सात शेडूल सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत सुरू आहे तसेच दररोज बसेस अल्टरनेट केल्या जातात मंगळवारी २२२ प्रवासी तर बुधवारी १९३ प्रवाशांची ये-जा होती लॉकडाऊनमुळे विवाह सोहळ्यापासून तर सर्वच कार्य स्थगित असल्याने त्याचा परिणाम प्रवाशावर झाला आहे. तर परिणामी आर्वी आगारचे उत्पन्नही मोठ्या प्रमाणात घटले आहे.
- विनोद खंडार, वाहतूक निरीक्षक, आर्वी