चौपदरीकरणाचे अंतर कमी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 11:28 PM2018-06-09T23:28:44+5:302018-06-09T23:28:55+5:30

नियोजित राष्ट्रीय महामार्ग आर्वी शहरातून जात असल्याने आर्वी शहरातून या चारपदरी रस्त्यावर ३० मिटरचे अंतर ठेवण्यात आल्याने यात मोठ्या प्रमाणावर शहरातील व्यापारी प्रतिष्ठान व दुकाने उद्धवस्त होणार आहे.

Reduce the distance of the four-dimensional | चौपदरीकरणाचे अंतर कमी करा

चौपदरीकरणाचे अंतर कमी करा

Next
ठळक मुद्देनगराध्यक्षांना निवेदन : व्यापारी संघाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : नियोजित राष्ट्रीय महामार्ग आर्वी शहरातून जात असल्याने आर्वी शहरातून या चारपदरी रस्त्यावर ३० मिटरचे अंतर ठेवण्यात आल्याने यात मोठ्या प्रमाणावर शहरातील व्यापारी प्रतिष्ठान व दुकाने उद्धवस्त होणार आहे. या रस्त्याची नियोजित ३० मिटरची लांबी २० मिटर करावी, अशी मागणी आर्वीतील व्यापाऱ्यांनी नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाख यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
आर्वी-तळेगाव हा रस्ता राष्ट्रीय राज्य मार्गाकडे चारपदरी रस्ता बनविण्यासाठी हस्तांतरीत केला आहे. हा रस्ता आर्वीतील मुख्य रहदारीच्या ठिकाणाहून जात असल्याने आर्वी शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने मोठ्या प्रमाणात तोडल्या जाण्याची शक्यता आहे. गत ५० वर्षांपासून हे दुकानदार लिजवर दिलेल्या जागेवर साहित्य विक्रीकरून कुटुंबाचे पालन पोषण करतात. त्यांची दुकाने हटविल्यास त्यांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार असून रस्त्याच्या चौपदरीकरण करताना ते २० मिटर इतकेच करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे यांना निवेदन सादर करताना यावेळी सुनील कटियारी डॉ. प्रकाश राठी, खलील भाई, मदन शिंदे, शेख जाबीर, सुनील खिलोसिया, विजू गहलोत, रवी निंबाळकर, मोटवानी आदी व्यापाऱ्यांची उपस्थिती होती. आर्वीतील शिवाजी चौकातून हा चौपदरीकरणाचा मार्ग जाणार असल्याने शहरातून हा मार्ग दोनपदरी करावा. तसेच आर्वी शहरातील लिजवर दिलेल्या दुकानांची मुदत २०३० पर्यंत असल्याने या मार्गावर चौपदरीकरण रस्त्याचे अंतर २० मिटर ठेवण्याची मागणी केली आहे.

Web Title: Reduce the distance of the four-dimensional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.