भारनियमन कमी करा, अन्यथा मिटर काढून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 11:38 PM2017-10-07T23:38:00+5:302017-10-07T23:38:11+5:30

भारनियमनात वाढ केल्याने नागरिक संतप्त आहेत. मांडगावच्या शेतकºयांनी शनिवारी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक देत भारनियमन कमी करण्याची मागणी केली.

Reduce the load, otherwise remove the miter | भारनियमन कमी करा, अन्यथा मिटर काढून घ्या

भारनियमन कमी करा, अन्यथा मिटर काढून घ्या

Next
ठळक मुद्देशेतकरी, ग्रामस्थांची विद्युत कार्यालयावर धडक

लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर/मांडगाव : भारनियमनात वाढ केल्याने नागरिक संतप्त आहेत. मांडगावच्या शेतकºयांनी शनिवारी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक देत भारनियमन कमी करण्याची मागणी केली. शेतकरी कार्यालयात धडकताच अभियंत्याची चांगलीच भंबेरी उडाली. यावेळी भारनियमन कमी करावे, अन्यथा १८ ही गावांतील मिटर काढून न्यावे, अशी मागणी करण्यात आली. याबाबत निवेदनही सादर करण्यात आले.
सध्या भारनियमनाची समस्या सर्वत्र चर्चेत आहे. मांडगाव अंतर्गत येणाºया १८ गावांतील विद्युत ग्राहक, शेतकरी, विद्यार्थी सर्वांनाच याचा फटका बसत आहे. मांडगाव येथील वीज कंपनीच्या कार्यालय शनिवारी संतप्त शेतकºयांनी धडक दिल्याने गजबजले होते. बावापूर, बोथुडा, किनगाव, मांडगाव येथील सुमारे २०० ते २५० ग्रामस्थ वीज कार्यालयात पाहोचले. संतप्त नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या. २४ तासांत केवळ १० तास वीज मिळते. वीज नसल्याने चिमुकल्यांना गर्मीमुळे अनेक आजार जडत आहेत. डासांच्या प्रादुर्भावामुळे डेंग्यू, मलेरियासारखे आजार जडत आहे. दहावीनंतरचे शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना अभ्यास करणेही कठीण झाले आहे. घरात रात्री काळोखामुळे साप व इतर सरपटणाºया प्राण्यांची भीती निर्माण झाली आहे. या प्राण्यांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका झाला तर महावितरण जबाबदार राहिल, असा इशाराही देण्यात आला. शहरी भागात भारनिमयन कमी असते. तेथे माणसे राहतात तर गावात जनावरे राहतात काय, असा प्रश्नही निवेदनातून उपस्थित करण्यात आला.
ग्रामीण भागात किमान १४ तास वीज पुरवठा देता येत नसेल तर सर्व १८ गावांतील वीज पुरवठा खंडित करावा, अशी मागणी यावेळी संतप्त नागरिकांनी केली. महावितरणने वीज न कापल्यास आम्ही स्वत: पाऊल उचलू, असा इशाराही नागरिरकांनी दिला.
ग्रामस्थांना शांत करण्यासाठी उपकार्यकारी अभियंता पी.बी. उइके समुद्रपूर यांना मांडगाव उपकेंद्रावर बोलविण्यात आले. उपकेंद्रावरील तुमडाम, उईके, समुद्रपूरचे ठाणेदार आदींनी परिस्थिती हाताळली. भारनियमनावर तोडगा काढला जाईल, असे आश्वासन यावेळी शेतकºयांना देण्यात आले.

Web Title: Reduce the load, otherwise remove the miter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.