भारनियमनासह दुरूस्तीच्या कामांचाही सिंचनामध्ये खोडा

By admin | Published: September 7, 2016 01:08 AM2016-09-07T01:08:13+5:302016-09-07T01:08:13+5:30

पावसाच्या दडीमुळे पिकांना ओलित करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी मागील आठवड्यापासून

Regarding the maintenance of irrigation with irrigation | भारनियमनासह दुरूस्तीच्या कामांचाही सिंचनामध्ये खोडा

भारनियमनासह दुरूस्तीच्या कामांचाही सिंचनामध्ये खोडा

Next

शेतकऱ्यांची व्यथा : पाणी आणि ओलिताची सोय असताना पिकांवर येतेय अवकळा
रोहणा : पावसाच्या दडीमुळे पिकांना ओलित करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी मागील आठवड्यापासून ओलिताला सुरूवात केली आहे; पण सिंचनाच्या प्रयत्नात भारनियमनाच्या वेळेसह दुरूस्तीसाठी कित्येक तास वीज पुरवठा खंडित राहत असल्याने अडथळा निर्माण होत आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
शासनाकडून मागेल त्याला वीज, मंगळवारपासून शेतकऱ्यांना बारा तास वीज पुरवठा मिळणार, अशा कितीही घोषणा ऐकायला मिळत असल्या तरी विद्युत पुरवठ्याबाबतची वस्तुस्थिती विपरित असल्याचा अनुभव शेतकऱ्यांना येत आहे. रोहणा परिसरात आठवड्यातील सोमवार, मंगळवार व बुधवारी रात्री १२ ते सकाळी ९.४५ पर्यंत थ्रीफेज विद्युत पुरवठा असतो. उर्वरित दिवसांत सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.४५ या काळात विद्युत पुरवठा असतो. इतर वेळी भारनियमन केले जाते भारनियमनाच्या वेळा सोडून इतरवेळी विद्युत पुरवठा नियमितपणे व्हावा, अशी शेतकऱ्यांनी रास्त व निकडपूर्ण अपेक्षा आहे; पण भारनियमन नसलेल्या वेळेतही विद्युत पुरवठा खंडित राहत असल्याने रोहणा परिसरातील ओलित करण्यास इच्छुक शेतकरी त्रस्त झाले आहेत. सोमवार ते बुधवार या तीन दिवसांत रात्री विद्युत पुरवठा चालू असला तरी वन्य प्राण्यांच्या हिंसक स्वभावामुळे व सुरक्षेच्या दृष्टीने रात्री कुठलाही शेतकरी ओलित करू शकत नाही. या तीन दिवसांत खऱ्या अर्थाने सकाळी ६ ते ९.४५ याच काळात शेतकरी ओलित करतात.
भारनियमनाशिवाय इतर वेळीही विद्युत पुरवठा होत नसल्याने ओलितावर विपरित परिणाम होत आहे. किमान नियोजित भारनियमन नसलेल्या वेळेत नियमित व दोषरहित विद्युत पुरवठा करावा, अशी मागणी ओलित करणारे शेतकरी करीत आहेत. सध्या रोहणा येथे कनिष्ठ अभियंता म्हणून दातीर कार्यरत आहेत. ते स्वत: शेतकरी पुत्र आहेत. शेतकऱ्यांना नियमितपणे विद्युत पुरवठा व्हावा या मानसिकतेचे आहेत. तसा त्यांचा प्रयत्नही असतो; पण कर्मचाऱ्यांची कमतरता, प्रत्येक डिपीवर विद्युत पंपाच्या वाढत्या संख्येचे लोड व विद्युतच्या नवीन साहित्यातील कमी टिकावुपणा यामुळे वारंवार होणारे बिघाड तसेच भार वाहून नेणाऱ्या लोंबकळणाऱ्या तारा आणि झाडा-झुडूपातून जाणाऱ्या तारांमुळे विद्युत पुरवठ्यात बिघाड येतो. परिणामी, वारंवार विद्युत पुरवठा खंडित होतो, अशी त्यांची खंत आहे. बिघाडाची दुरूस्ती भारनियमनाच्या वेळेत करता येऊ शकत नाही. ती विद्युत पुरवठा सुरू असतानाच खंडित ठेवून करावा लागतो. ती त्या कार्यालय प्रशासनाची मर्यादा असल्याचे सांगण्यात आले. कारणे काहीही असली तरी शेतकऱ्यांना खंडित विद्युत पुरवठा ओलितदार शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
६ सप्टेंबरपासून विद्युत वितरण कंपनी शेतकऱ्यांना दररोज १२ तास विद्युत पुरवठा देणार, अशी घोषणा करण्यात आली होती. किमान त्या घोषणेची अंमलबजावणी तरी महावितरणने करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.(वार्ताहर)

Web Title: Regarding the maintenance of irrigation with irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.