रिलायन्स व बँकेविरुद्ध गुन्हा, पीक विम्याची व्यथा कायमच, आमदारांची शेतक-यांसह बॅकेत धडक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 08:26 PM2017-09-28T20:26:13+5:302017-09-28T20:26:43+5:30

विम्याचे हप्ते भरूनही शेतक-यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. यामुळे आमदारांसह शेतकºयांनी गुरुवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठत आपबिती सांगितली.

Regarding the Reliance and the Bank, the suffering of crop insurance is always, the MLAs fall in the bank with the farmers. | रिलायन्स व बँकेविरुद्ध गुन्हा, पीक विम्याची व्यथा कायमच, आमदारांची शेतक-यांसह बॅकेत धडक

रिलायन्स व बँकेविरुद्ध गुन्हा, पीक विम्याची व्यथा कायमच, आमदारांची शेतक-यांसह बॅकेत धडक

googlenewsNext

वर्धा : विम्याचे हप्ते भरूनही शेतक-यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. यामुळे आमदारांसह शेतकºयांनी गुरुवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठत आपबिती सांगितली. यावर झालेल्या चर्चेअंती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पंजाब नॅशनल बँक आणि विमा उतरविणारी रिलायन्स कंपनीवर शेतक-यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याच्या सूचना सावंगी पोलीस ठाणेदाराला दिल्या. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती. 

तत्पूर्वी शेतक-यांनी वर्धेचे आ. डॉ. पंकज भोयर यांच्यासह पंजाब नॅशनल बँक गाठली. येथे आमदारांनी बँकेचे व्यवस्थापक नेहरू यांच्याशी चर्चा केली. यावर त्यांनी बघतो आणि करतो असेच उत्तर दिले. यावेळी धामणगाव (वाठोडा) येथील शेतकरी काशिनाथ श्यामराव राऊत व चंद्रशेखर जगताप यांनी त्यांना निर्माण झालेल्या समस्येचे गा-हाणे मांडले.  शेतक-यांनीच बँक व्यवस्थापकांना विमा उतरविणाºया रिलायन्स या कंपनीच्या संबधीत अधिकाºयांचे भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. यावेळी बँक व्यवस्थापक नेहरू यांनी शेतक-यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु हा प्रकार नेहमीचाच असल्याचे समोर आले आहे. यामुळे शेतक-यांच्यावतीने विमा कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आ.डॉ. पंकज भोयर यांनी दिली. बँकेकडून प्रतिसाद मिळाला नसल्याने शेतकºयांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. यावेळी अधीक्षक निर्मलादेवी एस. यांनी शेतक*यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या.

शेतक-यांना मिळते ‘डीडी नॉेट फाऊंड’चे उत्तर 

विमा काढण्याकरिता शासनाकडून शेतक-यांना आमिष दाखविण्यात आले; मात्र त्याची मदत देताना मात्र अनेक अटी लादण्यात आल्या. या अटी पार करून विम्याचा लाभ मंजूर झालेल्या ३५६ शेतक-यांच्या खात्यात बँकेकडून रक्कम वळती करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र शेतकरी बँकेत गेले असता त्यांना डीडी नॉट फाऊंड असे उत्तर दिले आहे. 

माहिती देवूनही कृषी विभागाचे दुर्लक्ष 

विम्याची रक्कम मंजूर होवूनही शेतक-यांना लाभ मिळाला नाही. याची माहिती त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती यांना दिली. असे असताना त्यांच्याकडून कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. यामुळे अखेर शेतक-यांनी आमदारांची भेट घेत आपली व्यथा मांडल्याचे शेतकरी काशिराम राऊत यांनी सांगितले. 

Web Title: Regarding the Reliance and the Bank, the suffering of crop insurance is always, the MLAs fall in the bank with the farmers.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी