जिल्ह्यात ७१ हजारांवर बेरोजगारांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 06:00 AM2019-11-25T06:00:00+5:302019-11-25T06:00:11+5:30
या नोंदीवरून जिल्ह्यात बेरोजगारीचा भस्मासूर फोफावत असल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक वर्षी हजारो युवक शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात फिरत असतात. रोजगार मिळावा या हेतूने कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात आपल्या नावाची नोंदणी करून नोकरीची वाट पाहतात. कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सध्या हायटेक झाले आहे.
गौरव देशमुख।
लोकमत न्यूज नेटवर्क
वायगाव (नि.) : जिल्ह्यात बेरोजगारांचा आकडा वाढतच असल्याचे दिसून आले आहे. येथील कार्यालयात दररोज बेरोजगारांच्या नोंदी होत आहेत. यात तब्बल ७१ हजार ३७० बेरोजगारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात आपल्या नावाची नोंदणी केल्याची माहिती आहे.
या नोंदीवरून जिल्ह्यात बेरोजगारीचा भस्मासूर फोफावत असल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक वर्षी हजारो युवक शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात फिरत असतात. रोजगार मिळावा या हेतूने कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात आपल्या नावाची नोंदणी करून नोकरीची वाट पाहतात. कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सध्या हायटेक झाले आहे. परंतु, सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलांपर्यंत रोजगार पोहोचत नसल्याचे चित्र आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्यात चार विधानसभा मतदार संघ आहेत. या चार मतदारसंघातील आमदारांनी आपापल्या मतदार संघातील बेरोजगार युवकांसाठी रोजगार निर्मितीकरिता कुठलेही प्रयत्न केले नसल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी दहावी, बारावी आणि पदवी घेणाºया युवकांची संख्याही वाढत असून जिल्ह्यात बेरोजगारांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले आहे.
जिल्ह्यात घेण्यात येतात उद्योजकता मेळावे
जिल्ह्यात बेरोजगारांची वाढती संख्या पाहता येथील कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने रोजगार मेळावे घेण्यात येतात. तालुकास्तरावर मेळाव्यात युवकांची प्राथमिक निवड करण्यात येते. वर्धा जिल्ह्यात बेरोजगारांची आतापर्यंत लाखोंवर नोंदणी झाली आहे. बेरोजगारांनी त्यांच्या नोंदणी कार्डाची वैधता झाल्यानंतर त्याचे नूतनीकरण केले नाही. सध्या वर्धा जिल्ह्यात कौशल्य विकास रोजगार व उद्योजगता केंद्रामध्ये ७१ हजार ३७० बेरोजगारांची नोंद आहे.