शिक्षकांचे वेतन नियमित करा

By Admin | Published: March 1, 2015 01:21 AM2015-03-01T01:21:09+5:302015-03-01T01:21:09+5:30

पं.स. स्तरावर गटशिक्षण अधिकारी अशोक कोडापे यांच्यावतीने सर्व शिक्षक संघटनांची सहविचार सभा घेण्यात आली़ यात शिक्षकांचे वेतन नियमित करावे, ...

Regular teachers' pay | शिक्षकांचे वेतन नियमित करा

शिक्षकांचे वेतन नियमित करा

googlenewsNext

वर्धा : पं.स. स्तरावर गटशिक्षण अधिकारी अशोक कोडापे यांच्यावतीने सर्व शिक्षक संघटनांची सहविचार सभा घेण्यात आली़ यात शिक्षकांचे वेतन नियमित करावे, अशी मागणी सर्व संघटनांच्यावतीने करण्यात आली़ यावेळी शिक्षकांच्या अन्य प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावाही करण्यात आला़
सभेच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षण अधिकारी अशोक कोडापे होते. सभेत वर्धा तालुक्यातील शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मांडण्यात आले़ मागील सभेनंतर सोडविलेल्या प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. सभेत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे प्रतिनिधी जिल्हाध्यक्ष लोमेश वऱ्हाडे, साहेब राऊत, सुनील कोल्हे उपस्थित होते़ शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष वासुदेव डायगव्हाणे, शिक्षक समितीचे अजय मोरे, श्रीकांत अहेर, कास्ट्राईबचे राजू थूल, शिक्षक परिषदेचे अनिल कलोडे यांच्यासह सर्व संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्वांनी शिक्षक, शाळांच्या समस्या तसेच प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली़ हे प्रश्न सोडविण्यासाठी पं़स़ कार्यालयातील संबंधित कर्मचाऱ्यांना गटशिक्षण अधिकाऱ्यांनी सूचना दिल्यात़ देण्यात आला.
सभेमध्ये शिक्षकांचे वेतन दरमहा वेतन नियमित ५ तारखेपूर्वी करण्यात यावे आणि ते बँक आॅफ इंडियाच्या खात्यावरच नेफ्टद्वारे एसबीआयमधून जमा करावे़ त्यासाठी नव्याने एसबीआयचे खाते काढायला लावू नये़ आयकर २४ क्यू ची त्रैमासिक आॅनलाईन कार्यवाही वेळीच करण्यात यावी, २००९ पासूनची शाळा बांधकामातील अंतिम ५ टक्के रक्कम त्वरित द्यावी, शालेय पोषण आहार योजनेचे शाळांना मिळणारे अनुदान सप्टेंबर २०१४ पासून थकित आहे़ अन्न शिजविणाऱ्या महिलांचे मानधन आॅक्टोबर १४ पासून प्राप्त असताना अधीक्षकांच्या धोरणामुळे विलंब होत आहे़ चटोपाध्याय वेतनश्रेणीस पात्र शिक्षकांचे प्रस्ताव जि.प. मंजुरीकरिता पाठविण्यात यावे व मंजूर होऊन आलेल्यांची थकबाकी काढावी, अर्जित रजा व प्रसूति रजेची कपात केलेले वेतन थकबाकी काढावी, शिक्षकांचे प्रलंबित बदली प्रवास भत्ता बील काढावे, शिक्षकांचे दु्य्यम सेवा पुस्तके अद्ययावत करण्यात यावे व सेवापुस्तकात बदली झाल्याच्या नोंदी घेण्यात याव्या आदी मागण्यांवर चर्चा झाली़ बैठकीत गटशिक्षणाधिकारी कोडापे, संगीता महाकाळकर, गंभीर, वासेकर, जयश्री कांबळे, सोनपितळे आदी हजर होते़(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Regular teachers' pay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.