कर्जमाफीची अट शिथिल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 09:49 PM2017-08-22T21:49:19+5:302017-08-22T21:49:56+5:30
शेतकºयांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून नवीन हंगामात कर्ज मिळाले नाही. यातही शेताची पेरणी केली तर पावसाने दडी मारली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शेतकºयांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून नवीन हंगामात कर्ज मिळाले नाही. यातही शेताची पेरणी केली तर पावसाने दडी मारली. कर्जमाफी मिळेल या आशेवर असलेल्या शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार सरकारने केला. कर्जमाफीची अट शिथिल करुन शेतकºयांना आर्थिक व मानसिक आधार देण्याची मागणी ग्राम किसान पंचायतने केली आहे.
या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पाठविण्यात आली. कर्जमाफीचा लाभ घेताना नियम व अटी पूर्ण करताना शेतकºयांना त्रासदायक ठरत आहे. कृषी कार्यालयात माहिती विचारण्यास गेले असता योग्य माहिती मिळते नाही. आॅनलाईन अर्ज करताना तांत्रिक बाबी अडचणीच्या ठरतात. इंटरनेट कनेक्शन राहत नसल्याने अर्ज करण्यासाठी दिवस खर्ची घालावा लागतो. क्लिष्ट प्रक्रिया दूर सारुन सोपा मार्ग काढावा, सेतू केंद्रावर पर्याप्त सुविधी देण्यात याव्या. शेतकºयांना दिलासा देण्याची मागणी निवेदनातून केली आहे.
हिंगणघाट उपविभागात कोरडा दुष्काळ जाहीर करा - तिमांडे
यंदा पावसाच्या अनियमिततेचा परिणाम पिकांवर दिसून येत आहे. याचा फटका शेतकºयांना बसला असून हिंगणघाट, समुद्रपूर व सेलू तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनातून करण्यात आली. या मागणीचे निवेदन माजी आमदार राजू तिमांडे यांच्या नेतृत्वात उपविभागीय महसूल अधिकारी यांच्यामार्फत पाठविण्यात आले.
सरकारने कर्जमाफी तर जाहीर केले मात्र त्यात अनेक जाचक अटी टाकल्याने शेतकºयांची अडचण होत आहे. अनेक शेतकºयांना याचा लाभच मिळत नाही. वर्तमान परिस्थितीचा विचार करता शेतकºयांना हेक्टरी ५० हजार रुपयाची मदत देण्यात यावी. पावसाच्या लपंडावाने पिके सुकली असून जमीन भेगाळली आहे. त्यामुळे खरीप हंगामातून शेतकºयांना कितपत उत्पन्न मिळेल यावर प्रश्नचिन्ह आहे.
सदर तीन तालुक्यात दुष्काळ जाहीर करुन नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्यात यावे.याआधारे शेतकºयांना हेक्टरी किमान ५० रुपयाची मदत देण्यात यावी. यासह विविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.