धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांमुळे सामाजिक एकोपा वाढण्यास मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 06:00 AM2019-12-20T06:00:00+5:302019-12-20T06:00:18+5:30
पढेगाव येथे श्री संत वसंतबाबाच्या दत्तपंचमी उत्सवानिमित्त संत वसंतबाबा बहुउद्देशीय संस्था तथा महात्मा गांधी आयुर्वेद वैद्यकीय रुग्णालय तथा अनुसंधान केंद्र सालोड यांच्या वतीने संयुक्तरीत्या सर्व रोगनिदान व आयुर्वेदोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये १५० च्या वर रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : समाजामध्ये धार्मिकतेची आवड निर्माण व्हावी, धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमुळे समाज एकत्र येतात. त्यामुळे संस्काराची व संस्कृतीची जपवणूक होते. धार्मिक कार्यक्रमांमुळे अध्यात्म संबंध घट्ट होतात, युवा पिढीतही धार्मिकतेची आवड निर्माण व्हावी यासाठी समाजामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होणे गरजेचे आहे. धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमुळे सामाजिक एकोपा वाढण्यास मदत होते, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी पढेगाव येथे श्री संत वसंतबाबा दत्तपंचमी महोत्सव कार्यक्रमात केले.
पढेगाव येथे श्री संत वसंतबाबा दत्तपंचमी महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, तसेच विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा खासदार रामदास तडस यांच्या हस्ते झाला.
यावेळी श्री संत सयाजी महाराज, संत वासुदेव महाराज, सरपंच अनंत हटवार, उपसरपंच गोपाल दुधाने, शालीक तडस, रामभाऊ शेंडे, विजय गोमासे, वसंत पंचभाई, शोभा तडस, शरद तडस, तपासे गुरुजी, काळे, दंडारे गुरुजी, ढगे महाराज, अल्लीपूर, साठोणे गुरुजी यांच्यासह मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
५२ नागरिकांनी केले रक्तदान
पढेगाव येथे श्री संत वसंतबाबाच्या दत्तपंचमी उत्सवानिमित्त संत वसंतबाबा बहुउद्देशीय संस्था तथा महात्मा गांधी आयुर्वेद वैद्यकीय रुग्णालय तथा अनुसंधान केंद्र सालोड यांच्या वतीने संयुक्तरीत्या सर्व रोगनिदान व आयुर्वेदोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये १५० च्या वर रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. यावेळी डॉ. स्वप्नील बोरगे, दिव्यानी ढासार, विभा तडस, ममता, श्वेता दीक्षित या डॉक्टरांच्या चमूने रुग्णांची तपासणी केली. तसेच मंगळवारला येथील आरोग्य मित्र मंगेश मुडे व संत वसंत बाबा बहुउद्देशीय संस्था व सामान्य रुग्णालय वर्धा यांच्या वतीने संयुक्तरीत्या पढेगाव येथील हनुमान मंदिर परिसरामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये प्रामुख्याने पंकज रामदास तडससह सरपंच अनंता हटवार, उपसरपंच गोपाल दुधाने यांनी रक्तदान केले. तसेच बुधवारी दिंडी, मिरवणूक आदी कार्यक्रम झालेत. दिंडी मिरवणुकीमध्ये पढेगाव, चिकणीसह ९२ दिंड्यांनी सहभाग नोंदविला. सजावट केलेले उंट उत्सवातील आकर्षण ठरले. दहीहंडीनंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.