उल्लेखनीय कार्य करणारे नेहमीच सन्मानित होतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 23:56 IST2018-07-06T23:54:42+5:302018-07-06T23:56:10+5:30
कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणा जपत आपले कर्तव्य बजावतांना अनेक बाबींना सामोरे जावे लागते. असे असले तरी जो सदर बाबी पाळतो त्याचा एक दिवस सन्मान होत असतोच, असे विचार माजी आमदार आणि यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. सुरेश देशमुख यांनी व्यक्त केले.

उल्लेखनीय कार्य करणारे नेहमीच सन्मानित होतात
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणा जपत आपले कर्तव्य बजावतांना अनेक बाबींना सामोरे जावे लागते. असे असले तरी जो सदर बाबी पाळतो त्याचा एक दिवस सन्मान होत असतोच, असे विचार माजी आमदार आणि यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. सुरेश देशमुख यांनी व्यक्त केले.
ते सेलू येथील यशवंत महाविद्यालयात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय बोबडे, प्रा. डॉ. दिलीप देशमुख, स्टाफ क्लबचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेन्द्र मुंढे यांची प्रमुख्याने उपस्थिती होती. साडेतीन दशकाच्या सेवेनतर निवृत्त झालेले वरिष्ठ लिपिक प्रकाश भोयर व महाविद्यालयातील गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. अंजली हुमणे यांना आचार्य पदवी प्राप्त झाल्या बद्दल संस्थाध्यक्ष प्रा. सुरेश देशमुख यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला वर्धा येथील यशवंत महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रा. डी. व्ही. भोयर, प्रा. उमेश फासगे, पी. पी. सोनोणे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.