छायाचित्र काढताच महाराजाचे पलायन
By Admin | Published: October 6, 2014 11:16 PM2014-10-06T23:16:39+5:302014-10-06T23:16:39+5:30
नजीकचा करूळ-पावनगाव येथील गौरीच्या रिठावर दोन दिवसींपूर्वी तपस्येला बसलेल्या एका युवक महाराजाने छायाचित्र काढताच पळ काढला. यामुळे गावात विविध चर्चेला पेव फुटले आहेत.
कोरा : नजीकचा करूळ-पावनगाव येथील गौरीच्या रिठावर दोन दिवसींपूर्वी तपस्येला बसलेल्या एका युवक महाराजाने छायाचित्र काढताच पळ काढला. यामुळे गावात विविध चर्चेला पेव फुटले आहेत. ही घटना रविवारी उघड झाली.
येथील जंगलातील एका झाडाखाली या महाराजाने दोन दिवस ठाण मांडल्याने भाविकांची गर्दी वाढू लागली. गावाबाहेरील रिठावर गौळ-गवळणीची पुरातन मूर्ती आहे. सध्या तिथे सभोवताल झाडे वाढली आहेत. या रिठावर गवळी लोक राहत होते. आताही या रिठावर रात्रीच्या वेळेस काही नागरिक गुप्त धन शोधण्यासाठी येत असल्याची गावात दबक्या आवाजात चर्चा आहे. येथे झाडाखाली बसलेल्या कथित महाराजाने झाडावर एक झेंडी लावली. एका कापडी फलकावर ‘कोणीही बोलू नये व हात लावू नये’, असे लिहून ठेवले होते. हा प्रकार येथील सामाजिक कार्यकर्ते विलास लांबट याचा लक्षात येताच त्यांनी तिथे जाऊन पाहिले आणि त्या कथित महाराजाचे छायाचित्र टिपले. यानंतर तो महाराज तेथून पसार झाला.(वार्ताहर)