सेलूच्या एटीएमचे अवशेष महाकाळ परिसरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 06:00 AM2020-01-12T06:00:00+5:302020-01-12T06:00:21+5:30

सेवाग्राम येथील मेडीकल चौकातून एटीएम मशीन पळविल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी रात्री चोरट्यांनी सेलू शहराचे हृदयस्थान असलेल्या परिसरातून ९४ हजाराची रोकड असलेली एटीएम मशीन चोरून नेली. एटीएम मशीन चोरट्यांनी चारचाकी वाहनाचा वापर करून इतर ठिकाणी नेल्यापर्यंतच्या तपासापर्यंत पोलीस पोहोचत नाहीच तो शनिवारी सेलू-येळाकेळी मार्गावरील महाकाळ परिसरात एटीएमचे काही अवशेष सापडले.

Remnants of Selu's ATMs in Mahakal area | सेलूच्या एटीएमचे अवशेष महाकाळ परिसरात

सेलूच्या एटीएमचे अवशेष महाकाळ परिसरात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : गुरुवारी मध्यरात्री परिसरात कुणी नसल्याची संधी साधून स्थानिक को-ऑपरटीव्ह बँकेसमोरील ९४ हजारांची रोख असलेली बँक आॅफ महाराष्ट्राचे एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस येताच एकच खळबळ उडाली होती. तर याच एटीएम मशीनचे काही अवशेष शनिवारी सकाळी सेलू आणि सावंगी (मेघे) पोलीस स्टेशनच्या सीमेवर असलेल्या महाकाळ परिसरात आढळून आले आहे. ते सेलू पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी एटीएम मशीन पळविणारे चोरटे पोलिसांना अद्यापही गवसलेले नाही.
सेवाग्राम येथील मेडीकल चौकातून एटीएम मशीन पळविल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी रात्री चोरट्यांनी सेलू शहराचे हृदयस्थान असलेल्या परिसरातून ९४ हजाराची रोकड असलेली एटीएम मशीन चोरून नेली.
एटीएम मशीन चोरट्यांनी चारचाकी वाहनाचा वापर करून इतर ठिकाणी नेल्यापर्यंतच्या तपासापर्यंत पोलीस पोहोचत नाहीच तो शनिवारी सेलू-येळाकेळी मार्गावरील महाकाळ परिसरात एटीएमचे काही अवशेष सापडले. चोरट्यांनी पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने सदर एटीएमचे काही अवशेष धामनदीच्या कॅनलमध्ये फेकून यशस्वी पळ काढल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात आहे. पोलिसांनी सदर साहित्य जप्त केले असून हे सरफेझ आणि डिझीम केसींग सेलू येथील एटीएमचेच असल्याची खात्री सेलू पोलिसांकडून करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यातील सेवाग्राम आणि सेलू येथे एटीएम पळविल्याचा गुन्हा दाखल असल्याने सेलू, सेवाग्राम तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस समांतर तपास करीत आहेत. लवकरच चोरट्यांना अटक करण्यात येईल.
- नीलेश ब्राह्मणे, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. वर्धा.

Web Title: Remnants of Selu's ATMs in Mahakal area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :atmएटीएम