समृद्धी महामार्गाबाबत शेतकऱ्यांमधील संभ्रम दूर करा
By admin | Published: December 25, 2016 02:22 AM2016-12-25T02:22:48+5:302016-12-25T02:22:48+5:30
जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर-मुंबई समुद्धी महामार्गासाठी सध्या जमिनी संपादीत केल्या जात आहेत.
महामार्ग संघर्ष समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
वर्धा : जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर-मुंबई समुद्धी महामार्गासाठी सध्या जमिनी संपादीत केल्या जात आहेत. सदर उपक्रमाबाबत शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम असून शासनाची भूमिका स्पष्ट नाही नसल्याचा आरोप करीत समृद्धी महामार्गाविषयी शेतकऱ्यांच्या मनातील संभ्रम दूर करावा, अशा आशयाच्या मागणीचे निवेदन महामार्ग संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
सदर निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी स्वीकारले. निवेदनातून, केंद्र व राज्य शासनाचा नागपूर-मुंबई हा ७१० कि़मी.चा समृद्धी महामार्ग खऱ्या अर्थान महाराष्ट्राला समृद्ध करणाराच आहे. सदर महामार्ग वर्धा जिल्ह्यातील सेलू, वर्धा व आर्वी तालुक्यातून जात आहे. त्याकरिता सध्या जमीन संपादीत केल्या जात आहे. जमीन संपादन करण्यासंदर्भात तसेच रोख मोबदला, भूसंचयनाबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना रा. किसान सभेचे जिल्हाध्यक्ष संजय काकडे, रायुकॉचे संदीप किटे, राहुल घोडे, बाबुजी ढगे, अनिल ठाकरे, संजय भगत, अजित ठाकरे आदींची उपस्थिती होती.(शहर प्रतिनिधी)