शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मागण्या निकाली काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 11:48 PM2018-02-28T23:48:09+5:302018-02-28T23:48:09+5:30
राज्यातील खासगी व स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तात्काळ निकाली काढा अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे.
ऑनलाईन लोकमत
वर्धा : राज्यातील खासगी व स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तात्काळ निकाली काढा अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे. सदर निवेदनाची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना पाठविण्यात आली आहे.
अलीकडेच काढण्यात आलेला शासन निर्णय मागे घेण्यात यावा. सर्व शिक्षकांसाठी जुनी पेंशन योजना लागू करण्यात यावा. केंद्र शासनानाप्रमाणे राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात यावा. २३ आॅक्टोबर २०१७ चा वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करण्याबाबत शासन निर्णयातील अट क्रं.४ ची जाचक अट रद्द करावी. वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणीचे प्रशिक्षण त्वरीत आयोजित करावे. २० टक्के अनुदानास पात्र ठरलेल्या राज्यातील सर्व शाळांना वर्ग तुकड्यांना टप्पा अनुदान सरसकट मंजूर करावे. माहे फेबु्रवारी महिन्याचे वेतन आॅफ लाईन पद्धतीने करावे आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकाºयांना निवेदन देताना प्रवीण भोयर, अजय वानखेडे, सुरेश रोठे, सुधीर राठोड, प्रदीप झलके, श्रीधर लाभे, शुभांगी चिकटे, मनिषा साळवे, अर्चना देशमुख, सिद्धार्थ भारशंकर, गजानन इंगोले, संजय गलांडे, नरेश शेंडे, नितीन खराबे, दिलीप चव्हाण यांच्यासह महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.