शिकाऊ उमेदवारांच्या समस्या निकाली काढा

By admin | Published: May 7, 2017 12:42 AM2017-05-07T00:42:51+5:302017-05-07T00:42:51+5:30

महावितरण, महापारेषण, महानिर्मिती कंपनी मधील शिकाऊ उमेदवार व कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांकडे संबंधित अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे.

Remove the problem of learner candidates | शिकाऊ उमेदवारांच्या समस्या निकाली काढा

शिकाऊ उमेदवारांच्या समस्या निकाली काढा

Next

तांत्रिक अ‍ॅप्रेंटिस असोसिएशनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महावितरण, महापारेषण, महानिर्मिती कंपनी मधील शिकाऊ उमेदवार व कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांकडे संबंधित अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यांच्या विविध प्रलंबित मागण्या निकाली काढण्यात याव्या, अशी मागणी तांत्रिक अप्रेंटीस असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनातून, महानिर्मिती कंपनीत शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांकरिता १० टक्के पदे राखीव राहत असून त्या जागा ८० टक्के इतक्या करण्यात याव्या. ग्रॅज्युऐट अ‍ॅप्रेंटीसांना आरक्षण देण्यात यावे. शासनाच्या निर्णयाप्रमाणे सेवा योजना जाहिरातीतील ई. एस. बी. सी. उमेदवारांची निवड यादी लावण्यात यावी. महावितरण कंपनीत तृतीय व चतुर्थ श्रेणी सवर्गातील हजारो पदे रिक्त असून ते तात्काळ भरण्यात यावे. ‘ग्राम विद्युत व्यवस्थापक’ या पदाकरिता अनुभवी असलेल्या कंत्राटी कामगार व शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देत त्यांना किमान वेतनाच्या आधारे वेतन देण्यात यावे. उपकेंद्र सहायक ईलेक्ट्रीशियन आय. टी. आय. धारकांना एक वर्षाची शिकाऊ उमेदवारी हेच अनुभव ग्राह्य धरण्यात यावे. शासनाने सरळ सेवा भरतीकरिता वयोमर्यादेत वाढ केली असून त्यानुसार महापारेषण व महानिर्मिती कंपनीने याबाबत कार्यवाही करावी. महावितरण कंपनीमध्ये कार्यरत कंत्राटी कामगारांना कायम सेवेत सामावून घेण्यात यावे. त्याचप्रमाणे त्यांच्याकरिता सरळ सेवा भरतीमध्ये जागा आरक्षित ठेवण्यात याव्या. महावितरण कंपनीतील कार्यरत असलेल्या कुशल, अर्धकुशल, अकुशल कामगारांना शासन परिपत्रकानूसार किमान मुळ वेतनात वाढ करण्यात यावी यासह आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
सदर निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी स्विकारले. याप्रसंगी तांत्रिक अ‍ॅप्रेंटीस असो.चे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील, रोशन देशमुख, नितीन लांडगे, राजू जाधव, दिलीप तडस, सुमीत बिहारी, गुलाब कुरटकर, विपीन झोरे, प्रतीक सुरकार, मिलिंद वंजारी, शुभम बाळोले, मनोज सुपारे, दिनेश परचाके, दीपक ताजने, राजू कोचे, हर्षल रामटेके, इंद्रजित राठोड आदींची उपस्थिती होती.

 

Web Title: Remove the problem of learner candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.