दिव्यांग बांधवांच्या समस्या निकाली काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 12:05 AM2018-03-11T00:05:44+5:302018-03-11T00:05:44+5:30
दिव्यांग बांधवांच्या विविध समस्या तात्काळ निकाली काढण्यात याव्या, अशी मागणी प्रहार अपंग क्रांतीच्यावतीने जिल्हाधिकाºयांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी राजलक्ष्मी शाह यांनी स्वीकारले.
ऑनलाईन लोकमत
वर्धा : दिव्यांग बांधवांच्या विविध समस्या तात्काळ निकाली काढण्यात याव्या, अशी मागणी प्रहार अपंग क्रांतीच्यावतीने जिल्हाधिकाºयांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी राजलक्ष्मी शाह यांनी स्वीकारले.
संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग व्यक्तींचे मानधन त्यांच्या अपंगत्वाच्या टक्केवारीनुसार देण्यात यावे. संजय गांधी निराधार योजनेसाठी लागणारे उत्पन्न २१ हजार असून ती अट रद्द करण्यात यावी. ओबीसी व सामान्य प्रवर्गातील दिव्यांग बांधवांना घरकुल योजनेचा लाभ प्राधान्य प्रमाणे देण्यात यावा. शिवाय त्यांच्याकरिता नाविन्यपूर्ण वेगळी योजना सुरू करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये दिव्यांग बांधवांसाठी असलेले आरक्षित आसनावर कुणी अतिक्रमण करू नये याबाबत दक्षता घेण्यात यावी. नव्याने सुरू करण्यात आलेल्या वातानुकुलित शिवशाही बसेसमध्ये दिव्यांग बांधवांना सवलत देण्यात यावी. स्थानिक स्वराज्य संस्थांनी दिव्यांगांच्या वाट्याचा ३ टक्के निधी वेळीच खर्च करणे क्रमप्राप्त आहे. तो तात्काळ खर्च होण्यासंदर्भात संबंधितांना सूचना देण्यात याव्या. तसेच अनुदानात वाढ करावी. दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना अमोल क्षीरसागर, दर्शना घुमे, चंद्रशेखर देशपांडे, किशोर काळबांडे, सुनील पल्हारे, धनराज घुमे, सुनील मिश्रा, हरिभाऊ हिंगवे, मोरेश्वर शेंडे, विकास दांडगे आदींची उपस्थित होती. सदर निवेदनाची प्रत जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आली आहे.