रेशन कार्डातील त्रुटी दूर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 10:57 PM2018-07-16T22:57:32+5:302018-07-16T22:57:52+5:30
सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत सर्वसामान्य गरीब मानसांना वितरीत होणारे धान्य रेशन कार्डातील व प्रक्रियेतील त्रुटींमुळे मिळत नाही. या त्रुटी दूर करून गरीब नागरिकांना धान्य वितरण सुकर करावे, अशी मागणी जनवादी महिला संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत सर्वसामान्य गरीब मानसांना वितरीत होणारे धान्य रेशन कार्डातील व प्रक्रियेतील त्रुटींमुळे मिळत नाही. या त्रुटी दूर करून गरीब नागरिकांना धान्य वितरण सुकर करावे, अशी मागणी जनवादी महिला संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या कार्यकर्त्यांनी धडक देवून जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निवेदन सादर केले. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष प्रतीक्षा हाडके, सचिव दुर्र्गा काकडे, ज्येष्ठ नेत्या निर्मला वाघ यांनी केले. रेशनचे धान्य हा सर्वसामान्य गरीबांचा हक्क आहे. ते धान्य त्यांना मिळाले पाहिजे, यासाठी प्रक्रियेतील त्रुटी दूर कराव्यात. धान्य वाटपाचे प्रमाण प्रत्येक योजनेचे दर फलक लावून सर्वसामान्यांना कळवावे. नवीन रेशन कार्ड मागणाºयांना तातडीने ते वितरीत करण्यात यावे. जीर्ण रेशन कार्ड बदलून देण्यात यावे. पॉझ मशीनमध्ये अनेक लाभार्थ्यांचे अंगठे व्यवस्थीत जुळत नाही. त्यामुळे त्यांना धान्यापासून वंचित राहावे लागते. यासाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यात यावी. आरसी क्रमांक प्रत्येक कार्डधारकांना द्यावा. पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ महिलांना देण्यात यावा, आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले व याबाबत त्यांच्याशी चर्चाही करण्यात आली.
सदर मागण्यांबाबत तातडीने कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकाºयांनी यावेळी दिले. सदर मोर्चात अंजना काकडे, आरती पवार, कांता प्रधान, तुळसा पोले, भूमिका गाणार, लता टाक, कुंदा घंगारे, भारती रायकर, विमल पूजारी, चंदा वासेकर, द्वारका डांगे, पार्बता मुडे, रंजना पचारे, संगीता भगत, प्रतिभा कावनकुळे, सिंधू दांडेकर, माया चहांदे, प्रमिला नागपुरे, रंजना रंगारी, लंका धुर्वे, शारदा गजभिये, उषा राऊत, निर्मला झाडे, दिपमाला मालेकर, बेबी मन्ने, पंचफुला म्हैसकर, कालींदी कांबळे, कुमूद अरगडे, दुर्गा सहारे आदी सहभागी झाल्या होत्या.