सरळ खरेदी प्रकरणे निकाली काढा
By admin | Published: April 14, 2017 02:09 AM2017-04-14T02:09:06+5:302017-04-14T02:09:06+5:30
मदन तलाव, शिरुड प्रकल्प व कार नदी प्रकल्पांच्या भुसंपादित क्षेत्राकरिता सरळ खरेदी प्रकरणे भूसंपादन संस्थानी निकाली काढावे,
शैलेश नवाल : प्रकल्पाच्या भुसंपादित क्षेत्रातील प्रकरणे
वर्धा : मदन तलाव, शिरुड प्रकल्प व कार नदी प्रकल्पांच्या भुसंपादित क्षेत्राकरिता सरळ खरेदी प्रकरणे भूसंपादन संस्थानी निकाली काढावे, अशा सूचना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी गुरुवारी दिल्या. त्यांच्या सूचनांमुळे प्रकल्पाकरिता सरळ खरेदीची प्रकरणे निकाली निघतील, अशी आशा निर्माण झाली आहे.
मदन तलाव, शिरुड प्रकल्प व कार नदी प्रकल्पांतर्गत संपादित होत असलेल्या जमिनीच्या मुल्यांकनाबात सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत सर्व भूसंपादन संस्था उपस्थित होत्या. प्रकल्पाकरिता जमिनी अधिग्रहीत केल्यानंतर अनेक अडचणी निर्माण होतात. त्या वेळीच मार्गी काढण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.
या प्रकल्पासंबंधित सर्व भुधारकांनी सरळ खरेदीकरिता आवश्यक कागदपत्राच्या माहितीसह संपादित क्षेत्राचा मोबदला प्राप्त कण्याकरिता भुसंपादन संस्था लघु पाटबंधारे विभाग यशवंत कॉलेज समोर संपर्क साधावा असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी यांनी बैठकीत केले.(प्रतिनिधी)
सरळ खरेदीची ३६ प्रकरणे सादर
या बैठकीला संपादन संस्थेचे कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग यांनी सरळ खरेदी विक्री द्वारा भुसंपादन करण्याकरिता मुल्यांकन केलेली ३६ प्रकरणे सादर केली. या ३६ प्रकरण २३९.६२ हेक्टर क्षेत्राचे भुसंपादन सरळ खरेदी करण्याकरिता कार्यवाही करण्याच्या सुचना शैलेश नवाल यांनी दिल्यात. यामध्ये शिरुड प्रकल्पातील ४ प्रकरणात एकूण १०३.४० हे. मदन प्रकल्पाचे ११ प्रकरणात एकूण ४५.६९ हेक्टर कार प्रकल्पाचे १४ प्रकरणात ६७.०७ हेक्टर, सुकळी प्रकल्पाचे ६ प्रकरणात २२.९६ हेक्टर व लाल नाला उपसा प्रकल्पाच्या १ प्रकरणात ०.५४ हेक्टर जमीन संपादित करावयाची आहे.