आश्रमातील वास्तूंची दुरुस्ती, नूतनीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 09:49 PM2019-07-29T21:49:05+5:302019-07-29T21:49:20+5:30
येथील महात्मा गांधीजींच्या आश्रमामुळे सेवाग्रामचे नाव जगात प्रसिद्ध झाले. दरवर्षी जगभरातील पर्यटक आणि अभ्यासक मोठ्या संख्येने भेट देतात. त्यामुळे या आश्रमातील जुन्या वास्तूंची दुरूस्ती आणि नुतनीकरणाची आवश्यकता असून त्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : येथील महात्मा गांधीजींच्या आश्रमामुळे सेवाग्रामचे नाव जगात प्रसिद्ध झाले. दरवर्षी जगभरातील पर्यटक आणि अभ्यासक मोठ्या संख्येने भेट देतात. त्यामुळे या आश्रमातील जुन्या वास्तूंची दुरूस्ती आणि नुतनीकरणाची आवश्यकता असून त्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
येत्या २ आॅक्टोंबर रोजी महात्मा गांधी यांची १५० वी जयंती जगभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. त्या अनुशंगाने सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत कामे सुरु असून त्या कामांमध्येच आश्रमातील दुरूस्तीची आणि नुतणीकरणाचे कामे करावी. जुन्या गोशाळेच्या परिसरातील तीन गोदामाचे फ्लोरींग, प्लास्टर आणि दुरूस्तीचे काम, पाण्याची टाकी बांधण्यात यावी. हुतात्मा स्मारकाच्या बाजुला प्रतिष्ठानची जागा आहे त्या जागेवर शाँपींग काँम्प्लेक्स बांधावे. यात्री निवासच्या व प्रदर्शनीच्या मागील बाजूस संरक्षण भिंत बांधावी.
स्वागत कक्षाच्या चारही बाजुची जमीन समतल करून सुशोभित करणे, जुन्या गोशाळेतील कार्यकर्ता निवासाची दरुस्ती व त्यावर टिना टाकून प्लास्टर करून छफाई करावी. यासोबतच यात्री निवासच्या कार्यालयाची दुरुस्ती, गांधीजींच्या काळातील जुन्या पोस्ट कार्यालयाचे नुतनीकरण, नवीन गोशाळेच्या गोदामाचे फ्लोरींग, विहीरींचे खोलीकरण आदी कामे करण्यात यावी, अशी मागणी आश्रम प्रतिष्ठानचे मंत्री मुकुंद मस्के यांनी पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांना आश्रम भेटी प्रसंगी निवेदनातून केली आहे.
यावेळी आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार समीर कुणावार, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार आणि आश्रम प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सेवेकरी उपस्थित होते.