पावसासाठी महिलांचे वरुणराजाला साकडे
By admin | Published: June 25, 2017 12:42 AM2017-06-25T00:42:11+5:302017-06-25T00:42:11+5:30
सालोड (हि.) परिसरात गत आठ दिवसापासून पाऊस झाला नाही. रुसलेल्या वरुण राजाला प्रसन्न करण्यासाठी
ग्रामदेवतेची केली पूजा
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सालोड (हि.) परिसरात गत आठ दिवसापासून पाऊस झाला नाही. रुसलेल्या वरुण राजाला प्रसन्न करण्यासाठी सालोड (हिरापूर) येथील वॉर्ड २ मधील महिलांनी वरुणाला साकडे घालीत ग्रामदेवतेची पूजा केली. या भागात आठ दिवसांपासून पाऊस न झाल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांमध्ये दुबार पेरणीच्या संकटाची भीती आहे.
सुरूवातीला झालेल्या पावसामुळे अनेक सालोड (हि.) भागातील अनेक शेतकऱ्यांनी पेरणीची कामे पूर्ण केली. उन्हाची दाहकता कमी राहिल्याने पेरलेले विविध बियाणे उगवले. परंतु, आठ दिवसांपासून पाऊस न झाल्याने उगवलेली पिके पाण्याअभावी माना टाकत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पाऊसाने आठ दिवसापासून रजा घेतल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. रुसलेला वरुण राजा प्रसन्न व्हावा म्हणून वॉर्ड २ मधील महिलांनी एकत्र येत ग्रामदेवतेची पूजा केली. यावेळी सालोड (हि.) येथील वॉर्ड २ मधील लहान मुलांनी तसेच महिलांनी पाण्याची घागर डोक्यावर घेवून गावाला प्रदक्षिणा मारली.
यावेळी गावात धोंडीही काढण्यात आली होती. या उपक्रमात मंगला सुपारे, शुभांगी लोणकर, छाया देवतळे, सुनंदा चाफले, भारती लोणकर, पद्मा गायधने, प्रेमिला हजारे, शोभा चाफले, आशा तळवेकर, कलावती हिवसे, उज्वला हिंगे, मनोरमा लोणकर, सुनीता सातपुते, रोहिणी जुडे, ज्योती पोहाणे, योगीता सातपुते, कांता जुडे, वर्षा हिंंगे, वर्षा वंजारी, अभिजीत तळवेकर, अनुज वंजारी आदी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला गावातील बालगोपाल मोठया संख्येने उपस्थित होते. ग्रामदेवतेला नवैद्द दाखविण्यात आला.