‘त्या’ आत्महत्येप्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा

By admin | Published: January 23, 2016 02:20 AM2016-01-23T02:20:20+5:302016-01-23T02:20:20+5:30

दलित विद्यार्थ्यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या मानव संसाधन मंत्री स्मृती ईराणी, राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय तसेच ...

Report the crime of 'self' for suicide | ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा

‘त्या’ आत्महत्येप्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा

Next

तहसीलदारांना निवेदन : डॉ. आंबेडकर स्मारक समितीची मागणी
देवळी : दलित विद्यार्थ्यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या मानव संसाधन मंत्री स्मृती ईराणी, राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय तसेच अभाविपच्या पदाधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार तेजस्विनी जाधव यांना निवेदनातून केली.
हैदराबाद विद्यापीठात आचार्य पदवीचे शिक्षण घेत असलेला रोहित वेमुला हा डॉ. आंबेडकर स्टुंडट फ्रंटचा कार्यकर्ता होता. दलित विद्यार्थ्याच्या मागण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात त्याचा सहभाग होता. परंतु सदर आंदोलन दडपण्यासाठी अभाविपच्या पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून राज्यमंत्री बंडारू दत्तात्रय व केंद्रीय मानव संसाधन मंत्री स्मृती ईराणी यांनी दलित विद्यार्थ्यावर कारवाई करण्यासाठी कुलगुरूंवर दबाव आणला. दबावामुळेच कुलगुरूंनी रोहीतसह पाच दलित विद्यार्थ्यांना विद्यापीठातून निष्कासित केले. त्यांच्या सर्व सवलतीबंद क्ल्य. शिष्यवृत्तीपासूनही त्यांना वंचित करण्यात आले.
हा मानसिक त्रास असह्य झाल्यामुळे रोहीत वेमुलाने आत्महत्येच पाऊल उचलले. त्याच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

Web Title: Report the crime of 'self' for suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.