सोशल मीडियावर खोडसाळपणा करणाऱ्यावर गुन्हा नोंदवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 10:16 PM2017-12-11T22:16:39+5:302017-12-11T22:17:31+5:30

डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. आंबेडकर चौकात प्रदर्शन लावले होते. या प्रदर्शनाला खा. सुप्रिया सुळे यांनी भेट दिली.

Report crime on social media | सोशल मीडियावर खोडसाळपणा करणाऱ्यावर गुन्हा नोंदवा

सोशल मीडियावर खोडसाळपणा करणाऱ्यावर गुन्हा नोंदवा

Next
ठळक मुद्देराष्ट्रवादी युवक काँगे्रसचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

आॅनलाईन लोकमत
वर्धा : डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. आंबेडकर चौकात प्रदर्शन लावले होते. या प्रदर्शनाला खा. सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. यावेळी बाबासाहेबांचे हस्ताक्षर न्याहाळत असतानाचे त्यांचे छायाचित्र वनश्री वनकर यांनी फेसबुकवर पोस्ट केले. यानंतर ‘देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र’ या पेजच्या अ‍ॅडमिनने छायाचित्रात खोडसाळपणा केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँगे्रसने केली आहे.
खा. सुप्रिया सुळे यांच्या छायाचिात बदल करून खोडसाळ पोस्ट सर्वत्र व्हायरल होत आहे. यातील कमेंट्समध्ये लगेच खोडसाळ केलेले छायाचित्र बदलण्यात आले. या खोडसाळ पोस्टमुळे खा. सुळे यांची बदनामी झाली असून देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र या पेजच्या अ‍ॅडमिनवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी रायुकॉने केली. याबबात पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांना निवेदन दिले. सायबर क्राईमचे पोलीस निरीक्षक पराग पोटे यांच्याशीही चर्चा करण्यात आली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख, संजय कामनापुरे, डॉ. किशोर अहेर, अंबादास वानखेडे, धनराज तेलंग, सुनील भोगे, संदीप किटे, टी.सी. राऊत, राहुल घोडे, राहुल ढोक, संकेत निस्ताने आदी उपस्थित होते.
चित्र प्रदर्शनावरून राजकारण करू नये-युवा रिफॉर्मिस्टची मागणी
युवा दी रिफॉर्मिस्ट युथ असोसिएशनने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या जीवन चरित्रावर आधारित दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन लावले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन संघटनेच्या प्रतिनिधींनी केले. कुठल्याही राजकीय पक्ष वा नेत्यांना बोलविले नाही. खा. सुप्रिया सुळे हल्लाबोल आंदोलनात असताना त्यांनी प्रदर्शनास भेट दिली. यावेळी वनश्री वनकर यांनी त्यांना माहिती दिली. या प्रसंगाचा फोटो सोशल मिडीयावर एडीट करून प्रसारित केला. याबाबत वर्धा शहर पोलिसांत तक्रार करताच फोटो डिलीट करीत माफी मागितली; पण असे प्रकार घडू नये, अशी मागणी संघटनेने केली आहे.

Web Title: Report crime on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.