पीक कर्जविषयक समस्यांची सोडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 11:50 PM2018-06-23T23:50:39+5:302018-06-23T23:51:28+5:30

आमदार पंकज भोयर यांनी स्थानिक बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेला भेट देवून शेतकऱ्यांना पीक कर्जाबाबत येत असलेल्या अडचणीची सोडवणूक शाखा व्यवस्थापकाच्या मदतीने करून घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

Rescue on Crop Debt Problems | पीक कर्जविषयक समस्यांची सोडवणूक

पीक कर्जविषयक समस्यांची सोडवणूक

Next
ठळक मुद्देआमदार केळझर बँक शाखेला भेट : चार कर्मचाऱ्यांच्या भरवशावर चालतो कारभार

लोकमत न्यूज नेटवर्क
केळझर : आमदार पंकज भोयर यांनी स्थानिक बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेला भेट देवून शेतकऱ्यांना पीक कर्जाबाबत येत असलेल्या अडचणीची सोडवणूक शाखा व्यवस्थापकाच्या मदतीने करून घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. शाखा व्यवस्थापक पवन राईकवार यांच्या आमदारांना बँकेतील कामकाजाबाबत माहिती दिली.
सध्या पावसाळी हंगाम सुरु झाला आहे. शेतकऱ्यांची कर्ज घेण्यासाठी लगबग सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागात बँकांमध्ये मोठी गर्दी दिसून येत आहे. केळझर येथील बँकेत दहा गावाचे जवळपास ११ हजार खातेधारक आहे. येथे ४२३ शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले असून टप्प्याटप्प्याने त्याची यादी येत असल्याने यादीनुसार शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याची माहिती दिली जात आहे. पुढील यादीत आणखी आणखी २०० शेतकऱ्यांचे नावे येतील अशी माहिती शाखा व्यवस्थापक राईकवार यांनी आमदार डॉ. पंकज भोयर यांना दिली. शेतकऱ्यांवरील कर्ज हे शासनाकडून माफ होत असून आम्हाला फक्त व्याज माफ करण्याचेच अधिकार आहेत. त्यामुळे त्यामुळे शेतकऱ्यांनी याबाबी समजून घेतल्या तर काम अधिक सोईस्कर ठरेल. असे यावेळी आमदारांना बँक प्रशासनाने सांगितले. या शाखेत शाखा व्यवस्थापक, उप शाखा व्यवस्थापक यांच्यासह संगणक चालक व रोखपाल असे चार कर्मचारी आहेत. यांच्या सहायाने कर्जाची सर्व प्रकरणे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावेळी शेतकरी आशिष ईरुटकर, विलास नगराळे, वडगांव जंगली ,बाबाराव नरड, वासुदेव नखाते यांच्याशी आमदार डॉ. भोयर यांनी चर्चा केली. व कर्ज प्रकरणाबाबत काही अडचणी असल्यास सेलू तहसील कार्यालयात संपर्क करा असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी आमदार पंकज भोयर सोबत सेलूचे तहसीलदार महेंद्र सोनोने व विजय खोडे, विलास वरटकर, अशोक कलोडे, चंद्रशेखर वंजारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

शासनाने कर्जमाफी जाहीर केली असली तरी अजूनही जिल्ह्यात १३ ते १४ हजार शेतकऱ्यांची नावे यादीत आलेली नाही. त्यांनी अर्ज भरले होते. त्यामुळे आता पीक कर्ज घेतांना त्यांना बँकेत त्रास सहन करावा लागत आहे. बँकेकडे मनुष्य बळाची कमतरता असल्याने शेतकऱ्यांना बरेचवेळा परत जावे लागत आहे.

Web Title: Rescue on Crop Debt Problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.