सामाजिक उपयुक्तता व यथार्थतेचे संशोधन आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 11:55 PM2019-08-31T23:55:53+5:302019-08-31T23:56:47+5:30
समाजकार्य विभाग न्यू आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज येथे संशोधन प्रकल्प : गुणवत्ता आणि सामाजिक यथार्थता या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यक्रमात भंडारा येथील सामाजिक संशोधक डॉ. प्रदीप मेश्राम यांनीही मार्गदर्शन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : संशोधन मानवी विकासाकरिता अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. गरज आणि पूर्तता यामध्ये नवनवे संशोधने होतात. म्हणून शिक्षणात संशोधन महत्त्वाचे आहे. याकरिता विद्यापीठाने विविध अभ्यासक्रमात संशोधन प्रकल्प किंवा लघु शोधप्रंबंध यासारखे विषय अंतर्भूत केले, असे प्रतिपादन नागपूर विद्यापीठातील बोर्ड आॅफ स्टडीज व संशोधन नोंदणीकरण कमिटीचे अध्यक्ष डॉ. विजय शिंगणापुरे यांनी केले. समाजकार्य विभाग न्यू आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज येथे संशोधन प्रकल्प : गुणवत्ता आणि सामाजिक यथार्थता या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यक्रमात भंडारा येथील सामाजिक संशोधक डॉ. प्रदीप मेश्राम यांनीही मार्गदर्शन केले. शिंगणापुरे यांनी संशोधन हे सामाजिक यथार्थता समाजाच्या उपयुक्ततेचे होणे गरजेचे आहे. यातून कायदा धोरण आणि सामाजिक कृती साधता आली पाहिजे, असे सांगितले. डॉ. मेश्राम यांनी सामाजिक दृष्टीकोन आणि संशोधनाची मूल्ये जोपासून गुणवत्तेचे व सामाजिक सार्थकता संशोधन मूल्य जोपासून गुणवत्तेचे मूल्य संशोधनात गरजेचे आहे, असे सांगितले. कार्यशाळेला डॉ. आशीष ससनकर, डॉ. धनंजय सोनटक्के, प्राचार्य डॉ. चंदू पोपटकर, प्राचार्य डॉ. मिलिंद सवाई, उपप्राचार्य डॉ. धोंगडे, डॉ. प्रवीण वानखेडे, डॉ. लोकेश नंदेश्वर, डॉ. माधुरी झाडे, प्रा. कमल पोटदुखे, विविध महाविद्यालयातील प्राध्यापक आणि २७० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. आयोजनाकरिता प्रा. संदीप गिरडे, प्रा. रश्मी पड्डके, डॉ. निशांत चिकाटे, प्रा. लीना पुसदेकर यांनी तर योगिता झिलपे, पूजा हिवरे, सचिन रोटेकर, प्रियांका पुसाम, वैष्णवी पारधी, साधना कोसरे, मोनाली तुमाणे, पूजा नानवटकर, सुष्मिता मोहोड, स्रेहा यादव, पायल राऊत, चेतन पेटकर, अमोल, अंकुश पांडे यांनी सहकार्य केले. संचालन प्रा. प्रभाकर पुसदकर यांनी केले तर आभार पूजा हिवरे यांनी मानले.