‘संविधान बचाव लोकतंत्र चलाव’चा आवाज बुलंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 10:03 PM2018-01-27T22:03:05+5:302018-01-27T22:03:23+5:30
महिला काँग्रेसच्यावतीने स्थानिक सुभाषचंद्र बोस ते डॉ. आंबेडकर पुतळ्यापर्यंत शुक्रवारी मुकमोर्चा काढण्यात आला.
आॅनलाईन लोकमत
वर्धा : महिला काँग्रेसच्यावतीने स्थानिक सुभाषचंद्र बोस ते डॉ. आंबेडकर पुतळ्यापर्यंत शुक्रवारी मुकमोर्चा काढण्यात आला. सदर मुकमोर्चाचे नेतृत्त्व महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस, जिल्हाध्यक्ष हेमलता मेघे यांनी केले. मोर्चाच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांनी ‘संविधान बचाव लोकतंत्र चलाव’चा आवाज बुलंद केला.
शुक्रवारी दुपारी २ वाजतापासून एक-एक काँग्रेस कार्यकर्ता सुभाषचंद्र बोस पुतळा परिसरात गोळा होण्यास सुरुवात झाली होती. दुपारी ३ वाजता सदर मुकमोर्चा सुभाषचंद्र बोस पुतळा परिसरातून निघाला. इतवारा चौक होत दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास सदर मोर्चा डॉ. आंबेडकर पुतळा येथे पोहोचला. प्रारंभी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस यांनी मनोगत व्यक्त केले. दिवसेंदिवस महिलांवरील व समाजातील दुर्बल घटकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या सर्व प्रकाराला आळा घालण्याकडे केंद्रातील मोदी सरकार तर राज्यातील फडणवीस सरकार दुर्लक्ष करीत आहे. सध्या खºया अर्थाने संविधान वाचविण्याची गरज आहे, असे याप्रसंगी चारूलता टोकस यांनी सांगितले. या मोर्चात महिला काँगे्रसच्या कार्यकर्त्यांसह युवक काँग्रेसचे पदाधिकारीही सहभागी झाल्याचे दिसून आले.
मुकमोर्चा मध्ये काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे, रामभाऊ सातव यांच्यासह महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. गणतंत्रदिनी निघालेल्या या मोर्चात अनेकांची उपस्थिती होती.