वर्धा जिल्ह्यातील तलावांना भेगा पडल्याने नागरिकांना हलवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 12:07 PM2019-09-07T12:07:19+5:302019-09-07T12:08:01+5:30

मुसळधार पावसामुळे कुरझडी व रसुलाबाद येथील तलावांना भेगा पडल्याचे दिसून आल्याने येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

Residents of Wardha district moved to the area due to the floods | वर्धा जिल्ह्यातील तलावांना भेगा पडल्याने नागरिकांना हलवले

वर्धा जिल्ह्यातील तलावांना भेगा पडल्याने नागरिकांना हलवले

Next
ठळक मुद्देकुरझडी व रसुलाबाद येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: मुसळधार पावसामुळे कुरझडी व रसुलाबाद येथील तलावांना भेगा पडल्याचे दिसून आल्याने येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तालुक्यातील मौजा कुरझडी फोर्ट या गावाला लागून तलाव आहे. शनिवारी सकाळी स्थानिक लोकांना त्या तलावला चिरा पडल्याचे दिसून आले आहे. गावाला सावधान राहण्यास सांगितले आहे अशी माहिती तलाठी के जी पळसकर यांनी दिली आहे. तर आर्वी तालुक्यातील रसुलाबाद जवळील बारा सोनेगाव येथील तलावाच्या मुख्य भिंतीस भेगा पडल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले . तेथील 29 कुटुंबातील सुमारे 120 व्यक्तींना रसुलाबाद ते तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले आहे.

 

Web Title: Residents of Wardha district moved to the area due to the floods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :floodपूर