पावसाळ्यात दहा हजार वृक्षलागवडीचा संकल्प

By admin | Published: June 17, 2017 12:56 AM2017-06-17T00:56:27+5:302017-06-17T00:56:27+5:30

शहर हिरवेगार करण्याकरिता जनहित मंचने केलेल्या आवाहनानुसार विविध सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन श्रमदान केले.

The resolution of ten thousand trees in the rainy season | पावसाळ्यात दहा हजार वृक्षलागवडीचा संकल्प

पावसाळ्यात दहा हजार वृक्षलागवडीचा संकल्प

Next

शहरातील संस्था व संघटनांचा सहभाग : श्रमदानानंतर १ जुलैला करणार वृक्षारोपण
२लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहर हिरवेगार करण्याकरिता जनहित मंचने केलेल्या आवाहनानुसार विविध सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन श्रमदान केले. श्रमदानात शहरालगतच्या टेकडी परिसरात महावृक्षारोपणासाठी हजारो खड्डे खोदण्यात आले. वर्धेकरांनी दहा हजार वृक्षलागवडीचा संकल्प केला.
राज्य सरकारने हाती घेतलेल्या वृक्षलागवड उपक्रमाच्या अनुषंगाने जनहित मंचने सामाजिक दायित्व स्वीकारून महाश्रमदानाचे आयोजन केले. या महाश्रमदानाला जनहित मंच परिवारासह वन विभागाचे उप वनसरंक्षक दिगंबर पगार, मुरलीधर बेलखोडे, सोशल फोरमचे अभ्युदय मेघे, वैद्यकीय जनजागृतीचे मंचचे डॉ. सचिन पावडे, पोलीस उप अधिक्षक रवींद्र किल्लेकर, पक्षीमित्र प्रा. किशोर वानखेडे, पिपल फॉर अ‍ॅनिमल्सचे आशिष गोस्वामी, यांची उपस्थिती होती. यावेळी विविध सामाजिक संस्था व संघटनेचे सदस्य व पदाधिकारी श्रमदान करण्यकरिता आले होते.
यात लक्ष्मी लाईफ अ‍ॅक्टीव ग्रुप, जय महाराष्ट्र असोसिएशन ग्रुप, डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, युवा मित्र संस्था, अ.भा. महात्मा फुले समता परिषद, उड्डाण सामाजिक व शिक्षण संस्था, डॉ. आंबेडकर कॉलेज आॅफ सोशल वर्क, महाबली हनुमान संस्था प्रताप नगर, यशवंतराव दाते स्मृती संस्थान, पब्लिक फाऊंडेशन, रचना फाऊंडेशन, बहुजन संघर्ष समिती, नगर परिषद वर्धा, बा.दे. अभियांत्रिकी महाविद्यालय, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, होमगार्ड विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, जनकल्याण बचत गट, यंग स्टार ग्रुप, हरिओम प्राणायाम ग्रुप, योगासन समिती, किसान समूह संघटन, राष्ट्रीय हरित सेना, सक्षम ग्रुप, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, निवृत्त अधिकारी कर्मचारी कल्याणकारी असो. पोलीस विभाग, राष्ट्रीय कवी कला मंच, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा मुख्याध्यापक संघ, बहार नेचर फाउंडेशन यांचा सहभाग होता. यासह स्वयंसेवकांनी व वर्धेकरांनी वृक्षलागवडीसाठी हजारो खड्डे खोदले. या खड्ड्यात १ जुलैपासून विविध रोपटे लावून वृक्षारोपण सप्ताह राबविण्यात येणार आहे.

Web Title: The resolution of ten thousand trees in the rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.