आरक्षणासाठी आवाज केला बुलंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 11:27 PM2018-07-30T23:27:24+5:302018-07-30T23:27:59+5:30
मराठा समाजाला शिक्षण व शासकीय नौकरीत आरक्षण देण्यात यावे या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी मराठा समाज बांधवांनी एकत्र येत सोमवारी स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक ते उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. या आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले.
Next
ठळक मुद्देमराठा समाज बांधवांचा मोर्चा : उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना निवेदन
<p>लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : मराठा समाजाला शिक्षण व शासकीय नौकरीत आरक्षण देण्यात यावे या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी मराठा समाज बांधवांनी एकत्र येत सोमवारी स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक ते उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. या आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले.
आंदोलनकर्त्यांनी सुरूवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करीत काकासाहेब शिंदे आणि सोनवणे यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर मोर्चाला सुरूवात झाली. मोर्चा तहसील कार्यालयात येथे पोहोचताच आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय महसूल अधिकारी समाधान शेंडगे यांना सादर केले. विविध आंदोलने करूनही सरकार मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी ठोस पाऊल उचलत नसल्याचे दिसून येते. सरकारच्या याच मराठा विरोधी धोरणांचा निषेध यावेळी करण्यात आला. कुंभकर्णी झोपेचे सोंग घेणाºया सरकारने जागे होत मराठ्यांना आरक्षण द्यावे, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.
मोर्चात शरद शिर्के, दिनकर घोरपडे, यशवंत शिंदे, अनिल शिंदे, रमेश साबले, श्रद्धा निंबालकर, गीता भोसले, सविता साबळे यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव सहभागी झाले होते.