विविध समस्यांमुळे रसुलाबादचे नागरिक त्रस्त
By Admin | Published: July 6, 2015 02:22 AM2015-07-06T02:22:29+5:302015-07-06T02:22:29+5:30
ग्रा.पं. प्रशासनाचा संपूर्ण कारभार प्रभारावर सुरू असलेल्या लगतच्या रसुलाबाद येथील नागरिक सध्या विविध समस्यांमुळे जेरीस आले आहेत.
पुलगाव : ग्रा.पं. प्रशासनाचा संपूर्ण कारभार प्रभारावर सुरू असलेल्या लगतच्या रसुलाबाद येथील नागरिक सध्या विविध समस्यांमुळे जेरीस आले आहेत. गावात अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, दुर्गंधी, घाणीचे साम्राज्य आणि रस्त्यांची दुरवस्था यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देत ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
पाच-सहा वर्षांचा काळ लोटला असताना नाल्यांचे बांधकाम करण्यात आले नाही. शिवाय आहे त्या नाल्या स्वच्छही करण्यात आल्या नाही. यामुळे गावात अस्वच्छता व दुर्गंधी पसरली आहे. नालीवर असलेल्या दोन हातपंप व नळाच्या स्टँन्डवरून दररोज नागरिक पाणी भरतात. हे पाणी दूषित असण्याची शक्यता असताना ग्रा.पं. प्रशासन व आरोग्य विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. नागरिकांनी घरातच शेणखताचे ढिग साठविले आहे. त्यावर फवारणीही केली जात नाही. आठवडी बाजारातील धोपा वाढला असून अस्वच्छता पसरली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रस्त्यांवरही अवकळा आली असून चिखल साचतो. या समस्या निकाली काढून ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.(शहर प्रतिनिधी)