सेवानिवृत्त पोलिसांच्या समस्या निकाली निघणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:02 AM2018-02-18T00:02:07+5:302018-02-18T00:02:29+5:30

महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या कर्मभूमित सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे, ही आनंदाची बाब आहे. या कार्यात निश्चितच चांगले यश मिळेल अशी मला खात्री आहे.

Retiring police needs to be resolved | सेवानिवृत्त पोलिसांच्या समस्या निकाली निघणे गरजेचे

सेवानिवृत्त पोलिसांच्या समस्या निकाली निघणे गरजेचे

Next
ठळक मुद्देचारूलता टोकस : निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन

ऑनलाईन लोकमत
वर्धा : महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या कर्मभूमित सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे, ही आनंदाची बाब आहे. या कार्यात निश्चितच चांगले यश मिळेल अशी मला खात्री आहे. पोलीस कर्मचाºयांसह त्यांच्या कुटुंबियांना कुठल्या कुठल्या अडचणींना सामोरे जावे लागते त्याची आपणाला जाण आहे. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्या निकाली निघणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस यांनी केले.
नागठाणा रोडवरील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनात त्या मार्गदर्शन करताना बोलत होत्या. व्यासपीठावर संघटनेचे राज्य अध्यक्ष धनंजय जाधव, रामभाऊ सातव, गंगाधर पाटील, खंडेराव शिंदे, रामराव पवार, प्रविर चक्रवर्ती, अ‍ॅड. न्यायनिर्गूणे, सुखानंद साब्दे, मदन चव्हाण, अशोक गोरे, रवींद्र कानफाडे, डी.बी. बढिये आदींची उपस्थिती होती. संघटनेचे राज्य महासचिव सुखानंद साब्दे यांनी मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ नागरीक सेवा महासंघाचे अध्यक्ष रामभाऊ सातव यांनी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची वर्धा जिल्ह्यातील संघटनेच्या कार्याची प्रशंसा केली. याप्रसंगी प्रविर चक्रवर्ती व रामराव पवार यांनी देखील मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात राज्य संघटनेचे अध्यक्ष धनंजय जाधव यांनी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे सरकारने लक्ष देण्याची मागणी केली.
कार्यक्रमादरम्यान वीरमाता शांता वरहारे यांनी आपला पूत्र देशसेवेसाठी दिल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. स्वागतगीत विकास काळे व माधुरी काळे यांनी सादर केले. प्रास्ताविक वर्धा संघटनेचे अध्यक्ष गंगाधर पाटील यांनी केले. पहिल्या सत्राचे आभार संघटनेचे कार्याध्यक्ष, अंकुश पिंपरे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन माधुरी काळे व हेमा शिंदे यांनी केले. अधिवेशनाला वैकुंठ उईके, प्रल्हाद गिरपुंजे, तिडके, केशव खरडे, रमेश खेडकर, अंगद उईके, वसंत गायकवाड, मु. अ. खान, ज्ञानेश्वर वैद्य, अमृत मडावी, वासुदेव वरहारे, नरेंद्र व्यवहारे, विजय खोब्रागडे, मोरेश्वर तेलरांधे, मनोहर पोटदुखे, रमेश गुरनुले, दिलीप भागवतकर, वासुदेव बोंदरे आदींची उपस्थिती होती. अधिवेशनाच्या यशस्वीतेकरिता निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
न्यायनिर्गुणे यांनी मांडला ठराव
अधिवेशनादरम्यान अ‍ॅड. न्यायनिर्गुणे यांनी घटनेच्या संदर्भात ठराव मांडला. त्याला सर्वसंमतीने याप्रसंगी मंजूरी देण्यात आली. त्यानंतर अशोक गोरे यांनी प्रत्येक जिल्ह्यात संघटनेकरिता शासनाचे महसूल विभागाने कार्यालय व इतर बाबींकरिता भु-खंड उपलब्ध करून द्यावा व त्यात पोलीस गृहनिर्माण मंडळाने सहकार्य करावे असा ठराव मांडला. त्यालाही यावेळी मंजूरी मिळाली. कार्यरत पोलीस कर्मचाºयांचा ताण कमी व्हावा म्हणून कर्तव्याचा काळ आठ तासाचा करावा, असा ठरावही यावेळी घेण्यात आला.

Web Title: Retiring police needs to be resolved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.