निलंबन मागे घ्या; अन्यथा कर्मचारी पुरस्कार परत करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 12:03 AM2018-10-27T00:03:09+5:302018-10-27T00:04:44+5:30
जिल्हा परिषद आरोग्य विभागाने आकस्मिक दौरा करुन आकोलीच्या आरोग्य सेविकेला निलंबीत केले. परंतू याच दरम्यान मुख्यालयी नसलेल्या दोन वैद्यकीय अधिकाºयाना केवळ कारणे दाखवा नोटीस बजावला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्हा परिषद आरोग्य विभागाने आकस्मिक दौरा करुन आकोलीच्या आरोग्य सेविकेला निलंबीत केले. परंतू याच दरम्यान मुख्यालयी नसलेल्या दोन वैद्यकीय अधिकाºयाना केवळ कारणे दाखवा नोटीस बजावला. ही कारवाई चुकीची असून निलंबनाची कारवाई मागे द्या, अन्यथा सर्व कर्मचारांना आतापर्यंत मिळालेले पुरस्कार परत करावे लागेल, असा इशारा महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्यावतीेने देण्यात आला आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र झडशी अंतर्गत येणाºया आकोलीच्या उपकेंद्राच्या आरोग्य सेविका वंदना उईके (सयाम) यांना मुख्यालयी नसल्याच्या कारणावरुन निलंबित केले. त्या २२ आॅक्टोबर रोजी आरोग्य कर्मचाºयांच्या धरणे आंदोलनात सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत जि. प. समोर रजा घेऊन सहभागी झाल्या होत्या. आकोली येथे आरोग्य उपकेंद्र व आयुर्वेदिक दवाखाना आहे. संदर्भीय भेटीचे वेळी आयुर्वेदीक दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी कर्तव्यावर नव्हते परंतु हेतुपुरस्पर आरोग्य सेविकेलाच निलंबीत केले. उईके यांनी वर्धा जिल्हा परिषदेला सन्मान मिळवून दिला. त्यामुळे निलंबन मागे न झाल्यास जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाºयांना ‘आरोग्य मित्र पुरस्कार’ देण्यात आलेले परत करावे लागेल. एवढेच नव्हे तर राष्ट्रपती व राज्यपाल यांचेकडून मिळालेले पुरस्कार परत करण्यात येईल, असेही निवेदनात नमुद केले आहे. यावेळी राज्यकार्याध्यक्ष दिलीप उटाणे,नलिनी उबदेकर, दिपक कांबळे, सिध्दार्थ तेलतुंबडे, सुजाता कांबळे, अनुराधा परळीकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.