परतीच्या पावसाचा २०३ हेक्टरवरील पिकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 12:04 AM2019-11-04T00:04:33+5:302019-11-04T00:05:53+5:30
यंदाच्या वर्षी सुरूवातीला पावसाने दगा दिला. परंतु, त्यानंतर झालेला पाऊस उभ्या पिकांसाठी नवसंजीवनीच ठरला. शेतकऱ्यांनीही पिकांची योग्य निगा राखल्याने पिकांची वाढही बºयापैकी झाली. सध्या सोयाबीन मळणीच्या कामाला शेतकºयांकडून प्राधान्य दिले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : यंदाच्या वर्षी परतीच्या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चांगलीच अडचण वाढविली आहे. मागील दहा दिवसांत थांबून थांबून झालेल्या पावसाचा २०३.१५ हेक्टरवरील पिकांना चांगलाच फटका बसला आहे. तशी नोंदही जिल्हा प्रशासनाने घेतली असून झालेल्या नुकसानीबाबतचा प्राथमिक अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे.
यंदाच्या वर्षी सुरूवातीला पावसाने दगा दिला. परंतु, त्यानंतर झालेला पाऊस उभ्या पिकांसाठी नवसंजीवनीच ठरला. शेतकऱ्यांनीही पिकांची योग्य निगा राखल्याने पिकांची वाढही बºयापैकी झाली. सध्या सोयाबीन मळणीच्या कामाला शेतकºयांकडून प्राधान्य दिले जात आहे. असे असले तरी मागील दहा दिवसांत वर्धा जिल्ह्यात थांबून थांबून झालेल्या परतीच्या पावसामुळे तूर, कापूस व सोयाबीन या पिकांचे चांगलेच नुकसान झाले आहे. सदर परतीच्या पावसामुळे २७.६५ हेक्टर वरील कपाशी, २ हेक्टरवरील तूर तर १२८.५० हेक्टरवरील सोयाबीन पिकाचे ३३ टक्केच्या आत नुकसान झाले आहे. तर १७ हेक्टरवरील कपाशी, २५.८० हेक्टरवरील सोयाबीन पिकाचे ३३ टक्केच्यावर नुकसान झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. एकूणच परतीच्या पावसाने वर्धा जिल्ह्यातील शेतकºयांचे कंबर्डे मोडले असून हवालदील झालेल्या शेतकºयांना शासकीय मदतीची अपेक्षा आहे.
सेलू तालुक्यात सर्वाधिक शेतकºयांचे नुकसान
जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठविलेल्या प्राथमिक अहवालानुसार परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील एकूण ३१० शेतकºयांचे नुकसान झाले आहे. इतकेच नव्हे तर वर्धा तालुक्यातील ७१, सेलू तालुक्यातील १८०, देवळी तालुक्यातील १०, आर्वी व हिंगणघाट तालुक्यातील प्रत्येकी एक तर समुद्रपूर तालुक्यातील ४७ शेतकºयांचे नुकसान झाल्याचेही या अहवालात नमुद करण्यात आले आहे.
एकूण ४३ गावे बाधित
परतीच्या पावसाचा जिल्ह्यातील एकूण ४३ गावांना फटका बसला आहे. यात वर्धा तालुक्यातील सात, सेलू तालुक्यातील सात, देवळी तालुक्यातील चार, आर्वी तालुक्यातील एक, हिंगणघाट तालुक्यातील एक तर समुद्रपूर तालुक्यातील २३ गावांचा समावेश आहे.