मृत रुग्णाच्या खाटेवरील सव्वालाख परत केले, रुग्णालयाने नर्सला बक्षीस दिले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 07:14 PM2021-04-18T19:14:06+5:302021-04-18T19:14:29+5:30

सावंगी येथील शालिनीताई मेघे रुग्णालयातील कर्मचारी वृंदा चौधरी या सफाई करीत असताना त्यांना एका खाटेवर उशिखाली सव्वालाख रुपये, घड्याळ मिळून आले.

Returning Savvalakh from the dead patient's bed, the hospital rewarded the nurse | मृत रुग्णाच्या खाटेवरील सव्वालाख परत केले, रुग्णालयाने नर्सला बक्षीस दिले

मृत रुग्णाच्या खाटेवरील सव्वालाख परत केले, रुग्णालयाने नर्सला बक्षीस दिले

Next
ठळक मुद्देसावंगी येथील शालिनीताई मेघे रुग्णालयातील कर्मचारी वृंदा चौधरी या सफाई करीत असताना त्यांना एका खाटेवर उशिखाली सव्वालाख रुपये, घड्याळ मिळून आले.

वर्धा : मृत झालेल्या रुग्णाच्या खाटेवर पडून असलेले सव्वालाख रुपये रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याने रुग्णालय प्रशासनाकडे सोपविल्याने तिच्या प्रामाणिकतेची दखल घेत संस्थेकडून दहा हजारांचे बक्षीस देण्यात आले आहे. एकीकडे रेमडिसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार करुन मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणारी जमात पाहायला मिळत आहे. मात्र, या महिला कर्मचाऱ्याने प्रामाणिकतेचा पाठ समाजाला शिकवलाय. 

सावंगी येथील शालिनीताई मेघे रुग्णालयातील कर्मचारी वृंदा चौधरी या सफाई करीत असताना त्यांना एका खाटेवर उशिखाली सव्वालाख रुपये, घड्याळ मिळून आले. त्यांनी थेट हा ऐवज रुग्णालय प्रशासनाकडे सुपूर्द केला. रुग्णालय प्रशासनाने चौकशी केली असता हा ऐवज नुकत्याच निधन झालेल्या सुभाष राठी नामक रुग्णाचा असल्याचे कळाले. वृंदा चौधरी यांच्या प्रामाणिकतेची दखल घेत त्यांना दहा हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. तसेच, रुग्णलायाचे अधीक्षक डॉ. संदीप श्रीवास्तव, मुख्याधिकारी डॉ. उदय मेघे, कुलगुरू डॉ. राजीव बोरले यांनी कौतुक केले.

Web Title: Returning Savvalakh from the dead patient's bed, the hospital rewarded the nurse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.