जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ४८४१.७४ लाखांचा महसूल वसूल

By Admin | Published: April 11, 2017 01:19 AM2017-04-11T01:19:04+5:302017-04-11T01:19:04+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयाला जमीन, करमणूक कर, गौण खनिज आदीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होतो.

The revenue collection from the Collector Office is Rs 4841.74 lakh | जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ४८४१.७४ लाखांचा महसूल वसूल

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ४८४१.७४ लाखांचा महसूल वसूल

googlenewsNext

४९३९.५७ लाखांचे उद्दिष्ट : गौण खनिज विभाग वसुलीत पुढे
वर्धा : जिल्हाधिकारी कार्यालयाला जमीन, करमणूक कर, गौण खनिज आदीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होतो. यंदाच्या वर्षी जिल्हाधिकारी कार्यालयाला एकूण ४९३९.५७ लाखाच्या महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी मार्च अखेरपर्यंत ४८४१.७४ लाखाचा महसूल जिल्हाधिकारी कार्यालयाने वसूल केला आहे. यंदाच्या महसूल वसुलीत गौण खनिज विभाग पुढे असल्याचे दिसते.
जिल्हाधिकारी कार्यालयाचा करमणूक कर विभागाला आयोजित करण्यात येणारे मोठे कार्यक्रम, चित्रपटगृह, अधिकृत केबल एजन्सीधारक, गेम पार्लर आदीच्या माध्यमातून महसूल प्राप्त होता. त्याच प्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जमीन महसूल विभागही विविध माध्यमातून महसूल प्राप्त करतो. रेती, गिट्टी, मुरूम आदी गौण खनिजातून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गौण खनिज विभागाला महसूल प्राप्त होतो. यंदाच्या वर्षी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जमीन महसूल विभागाला १६०२.६६ लाखाचा महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी सदर विभागाने मार्च अखेरपर्यंत १३७२.९१ लाखाचा महसूल वसूल केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या करमणूक कर विभागाने दोन मोठे कार्यक्रम, सात चित्रपटगृह, १८ गेम पार्लर, २४७ अधिकृत केबल एजन्सी धारक व आदीच्या माध्यमातून यंदा मार्च अखेरपर्यंत १८३.६९ लाखाचा महसूल वसूल केला. या विभागाला यंदा २३० लाखाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्हा कचेरी कार्यालयातील गौण खनिज विभागाला यंदाच्या वर्षी ३१३६.९१ लाखाचा महसूल वसूल करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी मार्च अखेरपर्यंत ३२८५.१४ लाखाचा महसूल या विभागाने वसूल केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सदर तिन्ही विभागाने यंदा बऱ्यापैकी महसूल वसूल केल्याने वरिष्ठ अधिकारीही सदर विभागांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करताना दिसतात.(शहर प्रतिनिधी)

गत वर्षी ३८२९.८२ लाखांची वसुली
गत वर्षी जमीन महसूल, करमणूक कर, गौण खनिज या तीन विभागाला एकूण ४४६९.६६ लाखाचा महसूल वसूल करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यावेळी जमीन महसूल विभागाला ८७४.६६ लाख, करमणूक कर विभागाला १९५ लाख तर गौण खनिज विभागाला ३४०० लाख महसूल वसूल करण्याचे उद्दिष्ट आले होते. तत्कालीन परिस्थितीत जमीन महसूल विभागाने १७२९.७६ लाख, करमणूक कर विभागाने २४७.८१ लाख तर गौण खनिज भागाने १८५२.२५ लाखाचा महसूल वसूल केला होता. त्यावेळी सदर तिन्ही विभागाने एकूण ३८२९.८२ लाखाचा महसूल वसूल केला होता.

Web Title: The revenue collection from the Collector Office is Rs 4841.74 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.