जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक
By admin | Published: April 6, 2016 02:16 AM2016-04-06T02:16:50+5:302016-04-06T02:16:50+5:30
जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक सद्भावना भवन येथे घेण्यात आली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी राज्यमंत्री तथा आ. रणजीत कांबळे उपस्थित होते.
वर्धा : जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक सद्भावना भवन येथे घेण्यात आली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी राज्यमंत्री तथा आ. रणजीत कांबळे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष चारूलता टोकस तर अतिथी म्हणून श्याम उमाळकर, प्रभारी तानाजी वनवे, हुकूमचंद आमदरे, माजी जि.प. अध्यक्ष ज्ञानेश्वर ढगे, नगराध्यक्ष मनीष साहु, महिला काँगे्रस जिल्हाध्यक्ष हेमलता मेघे, पं.स. सभापती कुंदा भोयर, माजी जि.प. सभापती उषाकिरण थुटे, पुलगाव शहर अध्यक्ष रंजना पवार उपस्थित होते.
११ एप्रिल रोजी कस्तुरचंद पार्क नागपूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षाचा सांगता समारंभ आयोजित आहे. हा समारंभ अ.भा. काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. शिवाय युवक काँग्रेसतर्फे ८ एप्रिल रोजी सेवाग्राम ते अमरावती ते नागपूर संविधान संरक्षण यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या समारंभ आणि संविधान संरक्षण यात्रेला काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्हा काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस कमिटी, एनएसयुआय, काँग्रेस सेवा दल, अनुसूचित जाती, जमातीचे व विविध सेलच्या पदाधिकारी तसेच बैठकीला उपस्थित पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आ. रणजीत कांबळे व महिला काँग्रेस प्रदेश अध्यक्ष चारूलता टोकस यांनी केले.
प्रास्ताविक पुलगाव काँगे्रस शहराध्यक्ष रमेश सावरकर यांनी तर संचालन काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे यांनी केले. बैठकीला देवळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोहर खडसे, वर्धेचे उपसभापती पांडुरंग देशमुख, जि.प. सदस्य मोरेश्वर खोडके, मोहन शिदोडकर, मनोज चांदुरकर, कमलाकर शेंडे, प्रकाश पाटील, सय्यद शफात पटेल, सुनील बासू, युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदीप सुटे, विपीन राऊत, देवळीचे पं.स. सभापती भगवान भरणे, उपसभापती गुलाब डफरे, माजी जि.प. सभापती लक्ष्मण कांबळे, जि.प. सदस्य उज्वला राऊत, लांबट, माजी सभापती युवनाते, रवी भुजाडे, खुशाल पोफळे, मनीष गंगमवार, चंदू सुटे, अमित गावंडे, महेश तेलरांधे, सुधीर वसू, सलीम कुरेशी, गोविंद दैय्या, डब्बू शर्मा, शरद आडे, पुरूषोत्तम गोहणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांचे आभार विनोद हिवंज यांनी मानले.(कार्यालय प्रतिनिधी)