येळाकेळीच्या गिट्टीखदानवर तहसीलदारांसोबत राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 11:24 PM2018-07-30T23:24:56+5:302018-07-30T23:25:48+5:30

विना रॉयल्टी गौण खनिजाची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून तहसीलदार एम. ए. सोनोने यांनी आपल्या चमुसह येळाकेळी येथील गिट्टीखदान गाठून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मनमर्जी कारभार सुरू असल्याचे लक्षात येताच तहसीलदानांनी नियमानुसार कारवाई करण्याची इच्छा दर्शविताच चक्क तहसीलदारांसोबतच वाद घालण्यास सुरूवात करण्यात आली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याच वेळी सावंगी पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.

Ride with tahsildars on the Gilitkhand at this time | येळाकेळीच्या गिट्टीखदानवर तहसीलदारांसोबत राडा

येळाकेळीच्या गिट्टीखदानवर तहसीलदारांसोबत राडा

Next
ठळक मुद्देपोलिसांना केले पाचारण : परिसरात तयार झाली होती तणावाची परिस्थिती
<p>लोकमत न्यूज नेटवर्क
आकोली : विना रॉयल्टी गौण खनिजाची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून तहसीलदार एम. ए. सोनोने यांनी आपल्या चमुसह येळाकेळी येथील गिट्टीखदान गाठून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मनमर्जी कारभार सुरू असल्याचे लक्षात येताच तहसीलदानांनी नियमानुसार कारवाई करण्याची इच्छा दर्शविताच चक्क तहसीलदारांसोबतच वाद घालण्यास सुरूवात करण्यात आली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याच वेळी सावंगी पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.
येळाकेळी येथील गिट्टीखदान परिसरात अवैध उत्खनन केले जात असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. त्या आधारे तहसीलदार सोनोने यांच्या चमुने थेट येळाकेळी येथील गिट्टीखदान गाठून काही वाहनांची तपासणी केली. यावेळी एक वाहन विना रॉयल्टी तर दुसऱ्याची मुदत संपल्याचे आढळून आले. याच वेळी काही अवैध उत्खन्न माफियांनी वाहनचालकांना हाताशी घेत तहसीलदारांसोबत वाद केला. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रसंगी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून येळाकेळी येथे महसूल अधिकाºयांनी सावंगी पोलीसांना घटनेची माहिती देत त्यांना घटनास्थळी पाचारण केले. घटनास्थळी पोलिसांची चमु येण्यापूर्वीच तहसीलदार सोनोने यांच्या चमुने घटनास्थळावरून काढता पाय घेतला, हे विशेष.
‘त्या’ ठरावांना पाठ
गिट्टीखदान कायमस्वरूपी बंद करावी अशा आशयाचा ठराव येळाकेळी ग्रा.पं.मध्ये घेवून तो संबंधितांना पाठविण्यात आला आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्षच करण्यात धन्यता मानली जात आहे. उल्लेखनिय म्हणजे ग्रा.पं.ने एक-दोन वेळा नव्हे तर चक्क चार वेळा सदर ठराव घेतला असल्याचे सांगण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार आपण वाहनांची तपासणी केली. त्यात एक वाहन विना रॉयल्टी तर दुसºया वाहन चालकाजवळ असलेल्या रॉयल्टीची मुदत संपली असल्याचे दिसून आले. घटनास्थळी तणावाच स्थिती निर्माण झाल्याने सावंगी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.
- एम. ए. सोनोने, तहसीलदार सेलू.

येळाकेळी येथील गिट्टीखदान कायमस्वरूपी बंद व्हावी यासाठी वेळोवेळी ग्रा.पं.मध्ये ठराव घेवून संबंधितांना पाठविण्यात आले आहेत. तेथे होणाºया स्फोटामुळे अनेकांच्या घरांना तडे गेले आहेत. शिवाय वयोवृद्ध व रुग्णांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. पाठविलेल्या ठरावांकडे पाठ दाखविण्यातच धन्यता मानली जात असून आजच्या घटनेला खाबुगिरी प्रवृत्तीच जबाबदार आहे.
- रविशंकर वैरागडे, सरपंच येळाकेळी.

Web Title: Ride with tahsildars on the Gilitkhand at this time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.