प्लास्टिक पिशव्यामुळे जनावरांच्या जीवाला धोका

By admin | Published: June 28, 2014 12:37 AM2014-06-28T00:37:08+5:302014-06-28T00:37:08+5:30

पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, वाढते प्रदुषण या विषयावर आपण सहजपणे चर्चा करीत असतो आणि मोठ-मोठ्या कंपन्याना दोष देत असतो, ...

The risk of livelihood of plastic bags due to plastic bags | प्लास्टिक पिशव्यामुळे जनावरांच्या जीवाला धोका

प्लास्टिक पिशव्यामुळे जनावरांच्या जीवाला धोका

Next

वर्धा : पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, वाढते प्रदुषण या विषयावर आपण सहजपणे चर्चा करीत असतो आणि मोठ-मोठ्या कंपन्याना दोष देत असतो, परंतु आपण फेकलेल्या प्लास्टिकमुळे जनावरांचा जीव धोक्यात येत असल्याचे वास्तव समोर येत आहे.
दिवसेंदिवस प्लास्टिक वस्तूचा वाढता वापर इतका जास्त आहे की माणसाच्या जीवनाला अविभाज्य घटक हा प्लास्टिक होवून बसले आह़ कार्यप्रसंगात जेवनात, पिण्याचे पाण्याचे ग्लास, प्लास्टिक वाट्या यांचा सर्रास वापर सुरू आहे़ याचे दुष्परिणाम काय याचे थोडेसेही ज्ञान सामान्यांना नाही. काही जणांना याचे ज्ञान असूनही याकडे ते दुर्लक्ष करीत आहे. केवळ सहज व स्वस्त उपलब्ध होणाऱ्या गोष्टी आपले आकषण ठरत आहेत़
नदीनाद्यांद्वारे हा प्लास्टिक कचरा समुद्रात वाहत जाऊन आता समुद्रातही प्लास्टिकचा थर जमा व्हायला सुरूवात होत आहे़ जमिनीत न सडणारे प्लास्टिक जमिनीची जागा व्यापत असते. यापासून मानवाचा जीव कसा जाईल याची ज्वलंत उदाहरणे म्हणजे शहरात मोकाट फिरणारे जनावरे आहेत़ वर्धा शहरात नजिक असलेल्या पिपल फॉर अ‍ॅनिमल्स वर्धा द्वारा संचालित करूणाश्रम या आश्रमात शहरातील बेवारस जनावरांना आणण्यात येते. पोटात असलेल्या प्लास्टिकमुळे ही जनावरे दीर्घकाळ जगत नाहीत़ परिणामी मृत्यूनंतर २५ ते ३० किलो प्लास्टिक पिशव्या, गाईंच्या पोटातून निघतात. गो-मातची हिंदू धर्मीय आस्थेने पूजा करतात. पण याच गाई बॅचलर मार्गावर तसेच इतरही अनेक जागी जिथे कार्यालयातील अन्नपदार्थ आणि प्लास्टिक कचरा ताकल्या जातो तेथे अन्न खात असतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने प्लास्टिकच्या वस्तू अशा प्रकारे न फेकण्याचा निर्धार व्यक्त करने गरजेचे आहे. घरातल्या प्लास्टिक कॅरीबॅग व इतर कचऱ्याचे व्यवस्थित व्यवस्थापन केल्यास जनावरांचे प्राण वाचविणे शक्य आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज समाजातूनच व्यक्त होत आहे.(शहर प्रतिनिधी)

Web Title: The risk of livelihood of plastic bags due to plastic bags

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.