वर्धा जिल्ह्यातील आंजी मोठी येथे धाम नदीने बदलला प्रवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 12:00 PM2020-04-22T12:00:02+5:302020-04-22T12:02:07+5:30

वर्धा जिल्ह्यातील धामनदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर झुडपे व शेवाळे वाढले असल्याने पाण्याचा प्रवाहात अडथळे निर्माण झाल्याने नदीचे पात्र गावाकडे सरकले आहे.

The river changed its route at Anji Mothi in Wardha district | वर्धा जिल्ह्यातील आंजी मोठी येथे धाम नदीने बदलला प्रवाह

वर्धा जिल्ह्यातील आंजी मोठी येथे धाम नदीने बदलला प्रवाह

Next
ठळक मुद्देवेळीच उपाययोजना करणे आवश्यकगावाला पुराचा होऊ शकतो धोका

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: आंजी (मोठी) येथुन वाहणारी धाम नदी ही आंजीकरांसाठी जीवनदायिनी आहे. परंतु काळाच्या ओघात त्यामध्ये बरेच बदल झाले आहेत. धामनदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर झुडपे व शेवाळे वाढले असल्याने पाण्याचा प्रवाहात अडथळे निर्माण झाल्याने नदीचे पात्र गावाकडे सरकले आहे. नदीच्या पाण्याचा ओघ हा अवघडनाथ महाराज मंदीराच्या टेकडीवर आला आहे व यामुळे टेकडीची पाण्याने झीज होऊन टेकडीसुद्धा जमीनदोस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच येथून पाण्याचा प्रवाह नारायण महाराज मठाकडे वळतो त्या मुळे येथेही पावसाळ्यात पुराने नुकसान नाकारता येत नाही. त्यामुळे नदीचे पात्र स्वच्छ करुन नदीचे पुनरुज्जीवन करून पात्र पूर्ववत करावे अशी मागणी होत होती. मागील वर्षी महाकाळी प्रकल्पापासून येळाकेळीपर्यंत नदीपात्राची स्वच्छता जिल्हा प्रशासन व नाम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने होत होती चनकापुरपर्यंत झालीसुध्दा होती. त्यानंतर त्या पुढे नदी स्वच्छता अभियान थांबले. तेव्हापासून ते प्रलंबित आहे. धाम नदी ही वर्धा शहरासह ब-याच गावाची तहान भागविते पण तिच्या स्वच्छतेकडे कोणाचेच लक्ष नाही. याकडे वेळीच लक्ष घालणे आवश्यक आहे नाहीतर गावाला पुरामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ही नदी धाम प्रकल्पाचा येळाकेळीपर्यत मुख्य कालवा असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासनकडे पाठपुरावा केला आहे.
जगदीश संचेरीया,
सरपंच , आंजी (मोठी)


आमच्या बालपणी नदीचे पात्र खुप दुर होते. ते आज गावालगत आले आहे. यावर लवकर उपाय योजना करून नदी पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे.
सुनिल भादककर
ग्रामस्थ तथा अध्यक्ष
प्रेरणा फाऊंडेशन
आंजी मोठी

 

Web Title: The river changed its route at Anji Mothi in Wardha district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :riverनदी