बजाज चौकात भीम आर्मीचा रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 23:51 IST2018-12-29T23:49:19+5:302018-12-29T23:51:30+5:30

भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांना मुंबई पोलिसांनी कुठलेही कारण न सांगता हॉटेल येथून ताब्यात घेत अटक केली. याच घटनेच्या निषेधार्थ स्थानिक बजाज चौकात शनिवारी सकाळी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

The road of Bhima Army in Bajaj Chowk | बजाज चौकात भीम आर्मीचा रास्तारोको

बजाज चौकात भीम आर्मीचा रास्तारोको

ठळक मुद्देपोलिसांची उडाली तारांबळ : चंद्रशेखर आझाद यांच्या अटकेचा नोंदविला निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांना मुंबई पोलिसांनी कुठलेही कारण न सांगता हॉटेल येथून ताब्यात घेत अटक केली. याच घटनेच्या निषेधार्थ स्थानिक बजाज चौकात शनिवारी सकाळी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्त्व भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष आशीष सोनटक्के यांनी केले. अचानक करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची तारांबळ उडाली होती.
कुठलेही कारण नसताना आझाद यांना मुंबई पोलिसांनी हॉटेलमधून ताब्यात घेत अटक केली. हा प्रकार निंदनिय आहे. सदर प्रकरणी योग्य कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली होती. सदर आंदोलनाची माहिती शहर पोलिसांना मिळताच पोलिसांनी आंदोलन स्थळ गाठून सुमारे ३० आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात नेले. या आंदोलनामुळे बजाज चौकातील वाहतूक काही काळाकरिता खोळंबली होती. आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. या आंदोलनात आकाश टोनपे, सचिन पंडित, आशीष सलोडकर, बबलू राऊत, आशीष लोखंडे, दीपक गेडाम, सागर बाभळे, अलकेश पानबुडे, निखिल भानसे, अरविंद सेलकर, आशीष थुल, मयूर मांवटकर, स्वप्नील गाजरे, बंटी रंगारी, विलास गोरखेडे, आशिष रणधीर, अक्षय पाटील यांच्यासह भारिप व भीम आर्मीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
 

Web Title: The road of Bhima Army in Bajaj Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.