रस्त्यावरील उभ्या वाहनांमुळे होतेय वाहतुकीची कोंडी

By admin | Published: May 6, 2017 12:40 AM2017-05-06T00:40:31+5:302017-05-06T00:40:31+5:30

शहरातील मेडिकल चौकात आॅटोचालक इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशाच पद्धतीने आपली वाहने उभी करतात.

Road closure caused by vertical vehicles on the road | रस्त्यावरील उभ्या वाहनांमुळे होतेय वाहतुकीची कोंडी

रस्त्यावरील उभ्या वाहनांमुळे होतेय वाहतुकीची कोंडी

Next

मोठ्या अपघाताची भीती : पोलीस कारवाई कधी करणार?
सेलू : शहरातील मेडिकल चौकात आॅटोचालक इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशाच पद्धतीने आपली वाहने उभी करतात. परिणामी, येथे नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. सदर प्रकार मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारा असल्याने पोलिसांकरवी कारवाईची गरज निर्माण झाली आहे.
आॅटो चालक इतर वाहनचालकांचा विचार न करता आपल्या ताब्यातील वाहन रस्त्याच्या कडेला मनमर्जीने उभे करतात. या चौकात नेहमीच नागरिकांची गर्दी राहते. त्यामुळे येथे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. बहुदा वाहतुकीची कोंडीही या परिसरात होते. शहरातील काही भागात वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली असली तरी त्यांच्याकडूनही याकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याची ओरड आहे. या भागात व्यावसायिकांकडून अतिक्रमण करण्यात आले आहे. नागरिकांची समस्या लक्षात घेऊन सेलू ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)

शहरातील मुख्य चौक म्हणून मेडिकल चौकाची ओळख आहे. येथून बसस्थानक, यशवंत चौक, घोराड व बाजाराकडे जाण्यासाठी मार्ग आहे. परिणामी, येथे नेहमी नागरिकांची गर्दी असते. या भागात मनमर्जीने वाहने उभी केली जात असल्याने कुणी हटकल्यास बहुदा येथे किरकोळ वादही होतात. अनेक वाद पोलीस कचेरीपर्यंत पोहोचत नाहीत.

 

Web Title: Road closure caused by vertical vehicles on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.