रस्त्याचे खस्ताहाल; वहिवाटीस अडसर
By admin | Published: March 30, 2015 01:49 AM2015-03-30T01:49:14+5:302015-03-30T01:49:14+5:30
इतवारा येथून सेवाग्राम रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या मार्गाने वहिवाट करणे वाहन धारकांसाठी डोकदुखी ठरत आहेत.
वर्धा : इतवारा येथून सेवाग्राम रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या मार्गाने वहिवाट करणे वाहन धारकांसाठी डोकदुखी ठरत आहेत. हा मार्ग अरूंद असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. काही भागात रस्त उखडला असून मुरूम बाहेर पडला आहे. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्याच्या दुरूस्तीकडे स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
या रस्त्याने प्रवासी वाहतूक अधिक होते. सेवाग्राम रेल्वेस्थानक येथून बसस्थानकाकडे जाण्यासाठी पूर्वी हाच एकमेव मार्ग होता. कालांतराने विविध मार्ग विकसित झाले. त्यामुळे या रस्त्याच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले. रस्ता अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिल्याने डांबरीकरण उखडले आहे. तसेच यातून गिट्टी, मुरूम बाहेर पडल्याने वाहने नादुरुस्त होण्याचा धोका असतो. रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात वाहन चालकांना अपघात होतो. या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत नागरिकांनी प्रशासनाचे निवेदनातून लक्ष वेधले. मात्र अद्याप या रस्त्याची डागडूजी झालेली नाही.
सेवाग्राम रेल्वेस्थानक ते वर्धा बसस्थानक, इतवारा परिसराला जोडणाऱ्या या रस्त्याने प्रवासी, विद्यार्थी ये-जा करतात. रात्रीला या मार्गाने प्रवास धोकादायक ठरतो. येथे पथदिव्यांची व्यवस्था नसल्याने काळोख असतो. यात अभद्र घटना होण्याची शक्यता असते. या मार्गाचे मजबुतीकरण करण्याची मागणी आहे.(स्थानिक प्रतिनिधी)